Farmer Success Story : शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे पुणे शहराचा आकार वाढून उपनगरांची संख्या वाढली आहे. त्यातीलच उपनगर म्हणजे वाघोली. अहिल्यानगरला याच मार्गावरून जाता येत असल्याने या भागात वाहनांची प्रचंड मोठी वर्दळही पाहण्यास मिळते. याच वाघोलीपासून सुमारे एक किलोमीटरवर भाडळेनगर आहे. .येथील दत्तात्रय भाडळे यांची सुमारे तीस एकर शेती आहे. हे कुटुंब वास्तव्यास वाघोली येथेच आहे. दत्तात्रय पूर्वीपासूनच शेतीच करायचे. सन २०१२ च्या दरम्यान त्यांच्या हृदयाची ‘बायपास’ शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर मात्र रोजच्या कामकाजात काहीशा मर्यादा आल्या. मात्र शेतीची आवड व अनेक वर्षे त्यातच अनुभव असल्याने दत्तात्रय यांना स्वस्थ बसावेसे वाटेना. त्यामुळे त्यांनी दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला..दुग्ध व्यवसायातील वाटचालबायपास शस्त्रक्रियेनंतर दोन वर्षांच्या काळातच काही कालवडी खरेदी करून दुग्धव्यवसायाला सुरुवात झाली देखील. प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे तसेच घरच्या सदस्यांची व मजुरांची मदत घेत व्यवस्थापन सुरू केले. गोठ्यातच जनावरांची पैदास सुरू केली. त्यातून जनावरे खरेदीरील खर्च कमी केला. पाहता पाहता दहा वर्षांहून अधिक काळात दुधाळ जनावरांची संख्या १०० ते ११० च्या दरम्यान पोचली आहे. सध्या देशी, जर्सी अशा ४० ते ४५ पर्यंत गाई, तर मुऱ्हा व जाफराबादी अशा ५५ ते ६० म्हशी आहेत. दिवसाला गाई व म्हशींचे मिळून १७५ ते २०० लिटपर्यंत दुधाचे उत्पादन होते..Dairy Farming: मुक्तसंचार गोठ्यास पारदर्शक छत ठरेल फायद्याचे....व्यवस्थापन- कामकाजम्हशींसाठी प्रत्येकी २० गुंठ्यांत दोन गोठे त्याच पद्धतीने गाईसाठी दहा गुंठे क्षेत्राचे शेड व मोकळी जागा या पद्धतीचे स्वतंत्र गोठे आहेत. जनावरांच्या कानांना टॅगिंग केले आहे. व्यवसायात वेळेला अधिक महत्त्व दिले आहे. पहाटे चार वाजल्यापासून कामास सुरुवात होते. यामध्ये गोठे साफ करणे, खाद्य देणे अशी कामे केली जातात. पाच ते साडेसहाच्या दरम्यान दूध काढणीचे काम होते. सकाळी सात ते १० वाजेपर्यंत गोठा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला जातो. .म्हशीनाही स्वच्छ धुतले जाते. मधल्या वेळेत थोडी विश्रांती घेऊन पुन्हा दुपारी तीन वाजल्यानंतर कामांना सुरुवात होते. संध्याकाळी साडेचारनंतर दुधाची काढणी होते. ऊस, मका, सोयाबीन भुसा, ज्वारी कडबा अशा विविध हिरव्या चाऱ्याचा वापर होतो. प्रसंगी तो विकतही घ्यावा लागतो. दररोज एकूण तीन टन खाद्याची गरज बासते.गोठ्यात सुरक्षिततेसाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. उत्तरप्रदेश, नांदेड, परभणी येथील एकूण पाच मजूर कार्यरत आहेत. त्यांची राहण्याची सोय गोठ्याजवळच केली आहे. सर्व मजूर पहाटे चारपासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत काम करतात. .दूधविक्री व प्रक्रियायुक्त उत्पादनांची विक्रीसुरुवातीच्या काळात दुधाची थेट विक्री केली जायची. परंतु वाढते शहरीकरण व ग्राहकांची गरज लक्षात घेऊन दत्तात्रय यांनी दुधाचे मूल्यवर्धन करून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे ठरवले. आज दररोजच्या सुमारे दोनशे लिटरच्या दुधापैकी ग्राहकांची गरज ओळखून ४० लिटर दुधापासून लस्सी, दही, पनीर, खवा, पेढे, मलई बर्फी आदी पदार्थ तयार केले जातात..सुरुवातीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी होता. मात्र गुणवत्ता व सचोटी कायम ठेवून ग्राहकांमध्ये पदार्थांविषयी विश्वासार्हता तयार केली. त्यातून मागणी वाढत गेली. पदार्थ बनविण्यासाठी खवा तयार करण्यासाठीचे यंत्र घेतले. त्याचबरोबर दूध शीतकरण यंत्रणा, लस्सी निर्मिती यंत्र, तूप व लस्सी कप पॅकिग यंत्र, तुपासाठी क्रीम सेपरेटर, वाहन आदी सुविधा तयार केल्या आहेत..Dairy Farming Success : तेवीस वर्षाचा पृथ्वीराज झालाय कुटुंबाचा मुख्य कणा .वाघोलीत शंकरपार्वती नावाने छोटेखानी विक्री केंद्र वा डेअरी उभारली आहे. तेथून दूध व अन्य पदार्थांची विक्री होते. पुरवठ्यातील सातत्य, नैसर्गिक चव या बळावर अल्पावधीतचं चांगली मजल गाठली आहे. म्हशीचे दूध प्रति लिटर ८० रूपये, देशी गाईचे दूध ९० रुपये, तर जर्सी गाईचे दूध ६० रुपये दराने विकले जाते. दर महिन्याला श्रीखंड, तूप, दही, खवा, मलई बर्फी प्रत्येकी दहा किलो, पनीर ५० किलो, पेढे २५ किलो, यानुसार उत्पादन होते.प्रति महिना तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत मजल गाठली आहे. प्रक्रिया व्यवसायात मजुरी, वाहतूक, पॅकेजिंग मटेरिअल, वीज, डेअरी भाडे, कच्चा माल, चारा या बाबीवर मोठा खर्च होतो. साधारणपणे महिन्याला दीड ते पावणेदोन लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. या व्यवसायात दोन जणांना रोजगार दिला आहे..व्यवसायातील आनंददत्तात्रय यांचे वय सुमारे ६५ वर्षे आहे. त्यांचे वास्तव्य शेतातच असते. त्यांना पत्नी रत्नमाला यांची मोलाची साथ लाभली आहे. दोघांनी मिळून अनेक ग्राहक जोडले आहेत. व्यवसायाबद्दल आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की ‘बायपास सर्जरी’ होऊन काही वर्षे झाली. मात्र शेती, जनावरे व प्रक्रिया उद्योगात रमल्यामुळे मन आनंदी राहते.प्रकृती ठणठणीत आहे. माझ्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले आहेत. आज ती स्वतंत्र व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. मी मात्र शेतीत स्वतःला गुंतवून घेतले आहे. आर्थिकदृष्ट्या आमचे कुटुंब सक्षम आहे. परंतु शेतीतून मिळणारे मानसिक समाधान वेगळे आहे. नातवडांना घरचे दूध व पदार्थ खाण्यास मिळतात याचाही वेगळा आनंद आहे.दत्तात्रय भाडळे ९४२२०७८६९०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.