Sugarcane Cultivation : ऊस लागवडीमध्ये एकूण परिवर्तनीय खर्चाच्या साधारणपणे १६ ते १८ टक्के एवढा खर्च ऊस बेण्यावर होतो, त्यामुळे बेणे खर्चात बचत करून हा खर्च कमी करता येऊ शकतो. ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त रुंद सरी पद्धतीची लागण यांत्रिक तोडणीमुळे वाढत असल्यामुळे हा खर्च कमी करण्यास अधिक वाव आहे. हेक्टरी एक लाख गाळपायोग्य ऊस संख्या असावी लागते. त्यासाठी हेक्टरी वीस हजार दोन डोळा टिपरी गरज असते. .ऊस जातीच्या गुणधर्मानुसार व फुटव्याच्या क्षमतेनुसार यामध्ये बदल करणे गरजेचे असते. परंतु प्रत्यक्षरीत्या पारंपरिक पद्धतीत सरीतील कमी अंतरामुळे २५,००० ते ३०,००० पर्यंत दोन डोळे टिपरीची लागण केली जाते. यातून प्रत्येक डोळ्यास अंदाजे चारपट फुटवे धरले व त्यातील सर्वसाधारण ५० टक्के फुटवे मरण्याचे प्रमाण धरले, तरीपण ही संख्या हेक्टरी एक लाखांपेक्षा जास्त उरते. त्यामुळे हा ऊस व्यवस्थित पोसला जात नाही. तोडणीपर्यंत यातील परत १० ते २० टक्के ऊस मरतात. राहिलेला ऊस गाळपास येतो. त्यातूनही अपेक्षित हेक्टरी १२५ ते १५० टन उत्पादन मिळत नाही. खालील बदलांच्या साह्याने दोन डोळा टिपऱ्यांची संख्या कमी करून बेणे खर्चात कपात करता येऊ शकते..Sugarcane Fertilizer Management : उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर.एक डोळा बेणे लागवड.पॉली ट्रेमधील रोप लागवड.पॉलिबॅगमधील रोप लागवड.बडचीप रोप लागवड.गादीवाफा एक डोळा रोप लागवड.पारंपरिक पद्धतीपेक्षा योग्य हंगामानुसार व योग्य वेळेवर लागवड जर दोन डोळा पद्धतीने लागवड केली तर बेण्यामध्ये २५ टक्के बचत करता येऊ शकते, परंतु त्यासाठी योग्य मशागत, बेणे प्रक्रिया, कोरडी व वाफशावरची लागण व कमी प्रवाहाच्या सुरुवातीच्या सिंचन पाळ्या या सुधारित शेती पद्धतीचा अवलंब करावा..रासायनिक खतांमध्ये बचतरासायनिक खतावर ऊस उत्पादनामध्ये एकूण परिवर्तनीय खर्चाच्या तुलनेत १६ ते २० टक्के खर्च होत असतो. ऊस उत्पादन वाढ आणि उत्पादकतेसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे अत्यावश्यक ठरते.जिवाणू खतांचा वापरॲझोस्पिरीलम, ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, फॉस्फरस आणि पोटॅश विरघळविणारे जिवाणू संवर्धकांचा वापर करून रासायनिक खतांचा वापर कमी करता येऊ शकतो. ॲझोस्पिरीलम/ ॲझोटोबॅक्टरच्या वापरामुळे हेक्टरी ५० ते ७५ किलो नत्राची बचत करता येऊ शकते. त्यासाठी ५ ते १० लि/किलो ॲझोस्पिरीलमची मात्रा लागेल. या जिवाणू संवर्धकासाठी साधारणतः २५०-३०० रुपये एवढा खर्च येईल, परंतु त्या तुलनेत ५० किलो नत्रासाठी (११० किलो युरिया) ७०० ते ८०० रुपये लागतात. त्यामुळे योग्य त्या प्रमाणात नत्र खतांची बचत करता येऊन एकंदरीत उत्पादन खर्चात बचत करता येते. ॲझोस्पिरीलम जिवाणू खत व रासायनिक खताची कमी मात्रा एकत्रित वापरून ऊस उत्पादन वाढविता येऊ शकते..शिफारशीतील संपूर्ण रासायनिक खतांच्या तुलनेत ऊस उत्पादन खर्च कमी होण्याबरोबरच उत्पादकतेत वाढ होऊन जमिनीचे आरोग्य सुधारते. प्रति टन खर्चामध्ये सुद्धा घट होते. ॲसिटोबॅक्टरचा वापर केल्यामुळे नत्र खतामध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते.ऊस पिकास ५० टक्के नत्राची बचत करण्यासाठी आणि ऊस, साखरेचे अधिक उत्पादन घेण्यासाठी ग्लुकॅनोॲसिटोबॅक्टर डाय ॲझोट्रॉफिक्स या द्रवरूप जिवाणू खताची फवारणी ३ लिटर प्रति ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी ऊस लागवडीनंतर ६० दिवसांनी करावी. (संयुक्त कृषी परिषद शिफारस २००७)सुरू उसाच्या अधिक उत्पादनासाठी आणि २५ टक्के नत्रयुक्त खतांच्या बचतीसाठी ॲझोटोबॅक्टर या द्रवरूप जिवाणू खताची मात्रा प्रती हेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात दोन समान हप्त्यात बेणे प्रक्रियाद्वारे (१.२५ लिटर ॲझोटोबॅक्टर द्रवरूप जिवाणू संवर्धक १०० लिटर पाण्यात बेणे १५ मिनिटे बुडवून)आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस जमिनीतून (१.२५ लिटर ॲझोटोबॅक्टर द्रवरूप जिवाणू खत २५० लिटर पाणी) देण्याची शिफारस आहे. (संयुक्त कृषी परिषद २००८).Sugarcane Disease : ऊस पिकावर तांबेरा, करपा रोग.ऊस पिकामध्ये जिवाणू खतांचा प्रतिसाद हा जात, वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व प्रकार, जमिनीतील सेंद्रिय कर्ब पातळी, मृदेची रासायनिक अभिक्रिया आणि जिवाणू खतांची प्रत या सर्व बाबीवर अवलंबून असते, त्यामुळे नत्र खताचा वापर कमी करण्या अगोदर वरील सर्व बाबी आणि जिवाणू खताची प्रत याचा अभ्यास करावा.फॉस्फोबॅक्टर जिवाणू खते जमिनीत उपलब्ध असलेल्या व फॉस्फरस खताची दिलेल्या मात्रेची उपलब्धता वाढविण्यास मदत करते.ॲझोस्पिरीलम या जिवाणू खताचा वापर हा ऊस लागवडीनंतर ३० व ६० दिवसांनी करावा. फॉस्फोबॅक्टेरिन १० किलो/ हेक्टर या प्रमाणात लागणीच्या वेळी किंवा लागणीनंतर १५ ते २० दिवसांनी वापर करावा.शेणखतजेथे मुबलक प्रमाणात शेणखताचा वापर केला जातो तिथे ऊस उत्पादन अधिक असल्याचे दिसून येते. उदा. कर्नाटकातील दावणगिरी भागामध्ये ऊस शेतीमध्ये शेणखताचा वापर करतात त्यामुळे तेथे उसाचे उत्पादन चांगले येते.तसेच शेणखतासोबत योग्य प्रमाणात ते रासायनिक खतांचा वापर करतात.शेवटच्या वखरणी अगोदर शेणखत टाकण्याऐवजी ते लागणीच्या अगोदर सरीतून मिसळावे, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. स्फुरदाची उपलब्धता वाढण्यास मदत होते..प्रेसमड वापरसाखर कारखान्यातून प्रेसमड /मळी हा उपपदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतो. तो एक चांगला खताचा स्रोत म्हणून उपयोगी येऊ शकतो.प्रेसमडमधील घटकअन्नघटक प्रमाणसेंद्रिय कर्ब २०-२४ टक्केनत्र १.२६ टक्केस्फुरद ३.८३ टक्केपालाश १.४६ टक्केकॅल्शिअम ११.० टक्केमॅग्नेशिअम १.६५ टक्केसल्फर ०.२३ टक्केकॉपर ६९ पीपीएममॅंगेनीज ८९८ पीपीएमलोह २४ पीपीएमप्रेसमडच्या शिफारशीत वापरातून योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाशची बचत होऊ शकते, त्यासाठी हेक्टरी साधारणपणे १० ते १५ टन चांगली वाळलेली प्रेसमड शेतात मिसळावी किंवा शेणखतात मिसळून द्यावी.१० टन प्रेसमडमधून प्रति हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश अनुक्रमे ७० किलो, २१० किलो व ८० किलो मिळतो.प्रेसमडच्या अतिवापरामुळे जमिनीत समस्या निर्माण होऊ शकतात, जसे पाणी व हवेचे देवाण-घेवाण क्षमता कमी होणे तसेच पाणी झिरपण्याचा वेग मंदावणे इत्यादी. .प्रेसमडमध्ये काही प्रमाणात कॅल्शिअम व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. कच्ची किंवा ताजी प्रेसमड शेतात वापरू नये, कारण तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते. प्रेसमड एक ते दोन महिने वाळल्यानंतर शेणखतात मिसळून वापरावी. प्रेसमडचा वापर कंपोस्ट खत व त्यावर सूक्ष्मजीवांचा वापर करून तिची उपयोगिता मूल्य वाढवता येऊ शकते.प्रेसमडमधील घटकांची उपलब्धताघटक पदार्थ सेल्फेटेशन पद्धत कार्बोनेशन पद्धतसेंद्रिय कर्ब २०-२४ टक्के १३-१५ टक्केनत्र १-३.१ टक्के ०.६६-०.९टक्केपालाश ०.३-१.८ टक्के ०.३६-१.६ टक्केलोह ८८०-२५०० पीपीएम २१०० पीपीएमजस्त १५३-२७२ पीपीएम २७५-३४४ पीपीएममॅगेनीज ११०-१५०० पीपीएम २१५० पीपीएमकॉपर ४५-२११पीपीएम २५० पीपीएममळी ३ टक्के ७ टक्केसामू अल्कली जमिनीसाठी आम्लधर्मी जमिनीसाठीप्रेसमड खतातील पोषणद्रव्यांची इतर खतांसोबत तुलनाखत नत्र(टक्के) स्फुरद(टक्के) पालाश(टक्के)प्रेसमड खत १.८२ २.२५ १.९०गांडूळ खत २ १.२५ १.५०शेणखत ०.८० ०.७० १.३५पाचटाचे कंपोस्ट ०.७५ ०.७० १.२०- डॉ. गणेश पवार, ९६६५९६२६१७(लेखक ऊस पीक अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.