Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

Maharashtra Monsoon Update : राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्य व्यापण्यास आठ दिवसांचा उशीर केला आहे.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पुन्हा वेग घातला आहे. रविवारी (ता. २३) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्य व्यापण्यास आठ दिवसांचा उशीर केला आहे.

आता मॉन्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशासह देशाच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. यंदा केरळसह महाराष्ट्रात वेळेआधी पोचणाऱ्या मॉन्सूनने महाराष्ट्रात ६ जून रोजी हजेरी लावली.

१२ जूनपर्यंत खानदेश व पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात प्रगती केली होती. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल मंदावली होती. बंगालच्या उपसागरावरून प्रवाह क्षीण असतानाच, अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल थबकली होती.

गुरुवारी (ता. २०) तब्बल आठ दिवसांनंतर प्रगती करत मॉन्सूनने पूर्व विदर्भात चाल केली. शुक्रवारी (ता. २१) मॉन्सूनने आणखी चाल करत अमरावतीचा उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण विदर्भाचा प्रवास पूर्ण करत महाराष्ट्राचा बहुतांश भाग आपल्या छायेखाली घेतला होता.

रविवारी (ता. २३) खानदेश आणि विदर्भाचा उर्वरित भाग व्यापून संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून पोचला आहे. तसेच संपूर्ण ओडिशा, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंडच्या आणखी काही भागांत मॉन्सून धडकला आहे.

दोन ते तीन दिवसांत उर्वरित छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार राज्य आणि गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंडसह उत्तर भारताच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT