Rain Update  Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सून आज पुढे सरकला; राज्यात उष्णतेची लाट आणि वादळी पावसाचाही अंदाज

Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सून आज आणखी काही भागात प्रगती केली. एक दिवसाच्या मुक्कानंतर माॅन्सूनची वाटचाल पुन्हा सुरु झाली. माॅन्सूनच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर राज्यात पुढील दोन दिवस काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने आज मालदीव आणि कोमोरिन भाग, तसेच श्रीलंका, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भागात आणि अंदामान समुद्राचा आणखी भाग माॅन्सूनने व्यापला. तर अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मीती झाली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र मागील तीन तासांपासून ईशान्येकडे सरकत आहे. हे कमी दाब क्षेत्र ईशान्येकडे सरकत राहण्याचा अंदाज असून उद्या म्हणजेच २५ मे रोजी सकाळी या कमी दाब क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. तर रात्रीपर्यंत याचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळामध्ये होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच दक्षिण केरळमध्येही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. 

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा हवामानाचा इशारा दिला. विदर्भ, मराठवाड्यात ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक तर खानदेशातील जळगाव, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT