High Temperature : उष्ण झळांनी अंगाची काहिली

Weather Update : राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह राज्यात वादळी पावसाचा इशारा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
High Temp
High TempAgrowon
Published on
Updated on

Pune News : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या वेगवान उष्ण वाऱ्यांचे प्रवाह राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्य चांगलेच तापले आहे. उष्ण झळांनी अंगाची काहिली होत असून, उकाड्याने चांगलाच घामटा निघत आहे. आज (ता. २४) राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह राज्यात वादळी पावसाचा इशारा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

High Temp
High Temperature : सूर्य कोपला, जमीन होरपळली

पाकिस्तान आणि भारतामध्ये सध्या जगातील सर्वाधिक तापमान अनुभवायला मिळत आहे. गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पाकिस्तानातील जाकोबाबाद येथे जगभरातील सर्वाधिक ४८.५ तापमान नोंदले गेले आहे. तर त्यापाठोपाठ राजस्थानातील बारमेरचा दुसरा क्रमांक लागत असून, तेथे देशाचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८ अंश तापमान नोंदले गेले आहे. फालोदी, चुरू आणि जैसलमेर या शहरांचाही जगातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये समावेश असल्याचे ‘अलडोरॅडो वेदर’ या संकेतस्थळाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तान व अफगाणिस्तानमार्गे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारतात उष्मा वाढला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने उष्ण वारे गुजरात आणि महाराष्ट्राकडे येत आहेत. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

High Temp
Monsoon Rain : माॅन्सूनचा श्रीलंकेत मुक्काम; राज्यात दोन दिवस पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा

गुरुवारी (ता. २३) राज्यातील अकोला येथे उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे ४४ अंश तर परभणी, अमरावती, ब्रह्मपुरी, बीड येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. राजस्थानपासून मराठवाड्यापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाची हजेरी कायम आहे. आज (ता. २४) विदर्भासह, मध्य महाराष्ट्र व कोकणात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३८.९, धुळे ४४, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्‍वर ३१.८, नाशिक ४२, निफाड ४१.८, सांगली ३७.६, सातारा ३५.८, सोलापूर ४०.८, सांताक्रूझ ३४.७, डहाणू ३६.४, रत्नागिरी ३३.३, छत्रपती संभाजीनगर ४१.४, बीड ४३.१, नांदेड ४१.२, परभणी ४३.४, अकोला ४४.८, अमरावती ४३.४, भंडारा ४२.१, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४३.२, चंद्रपूर ४२.२, गडचिरोली ४२.२, गोंदिया ३९.७, नागपूर ४१.२, वर्धा ४२.९, वाशीम ४०.२, यवतमाळ ४२.७.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, अकोला.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

४३ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे : अकोला ४४.८, धुळे ४४, परभणी ४३.४, अमरावती ४३.४, ब्रह्मपुरी ४३.२, बीड ४३.१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com