Monsoon Rain Agrowon
हवामान

IMD Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी बरसणार ; हवामान विभागाचा अंदाज

Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. ७) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची इशारा तर विदर्भ, मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

कमी दाबाचे क्षेत्र पाकिस्तानकडे सरकले आहे. मॉन्सूनचा आस या कमी दाबाच्या केंद्रापासून सिकार, ग्वालियर, चुर्क, पुरुलिया ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच वरील कमी दाब केंद्रापासून पूर्व बिहारपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला होता. तर उर्वरित राज्यातही अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. घाटमाथ्यावरील दावडी येथे उच्चांकी ११० मिलीमीटर, शिरगाव येथे ९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.

आज (ता. ७) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची 'येलो अलर्ट' आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT