Monsoon  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात सर्वदूर पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Rain Update : आज (ता. २०) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या विविध भागात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून उन्हाचा चटका आणि उकाड्या पाठोपाठ दुपारनंतर वळीव स्वरूपाचा पाऊस दणका देत आहे.

आज (ता. २०) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या गंगानगरपासून, दिल्ली, कानपूर, देहरी, बंकुरा, कमी दाबाचे केंद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. रायलसिमा आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून तमिळनाडू, कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५ अंश तापमानाची नोंद झाली. सकाळपासून वाढलेल्या उकाड्यानंतर दुपारी जोरदार सरी कोसळत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाने तडाखा दिला आहे.

आज (ता. २०) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT