Maharashtra Cold Wave Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : किमान तापमानात घट होण्याचा अंदाज

Winter Weather Update : राज्यातील गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यातील गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. आज (ता. ३) राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. गुरुवारी (ता. २) बिहारमधील ‘देहरी’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात पहाटे धुके पडत असून, किमान तापमानात घट होत आहे. राज्यात १५ अंशांच्या पार गेलेला किमान तापमानाचा पारा खाली येत असतानाच दुपारच्या वेळी वाढलेला उकाडा कमी होऊ लागला आहे.

गुरुवारी (ता. २) नागपूर येथे राज्यातील नीचांकी ८.८ अंश तापमान नोंदले गेले. तर धुळे, गोंदिया, भंडारा येथे किमान तापमान १० अंशांखाली घसरले आहे. आज (ता. ३) राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २९.८ (१३.७), अहिल्यानगर ३०.१ (१२.५), धुळे ३० (९.५), जळगाव २८.२ (१२.९), जेऊर ३१.५ (१४.५), कोल्हापूर २९.६ (१७.८), महाबळेश्‍वर २५.५ (१३.८), मालेगाव २७.८ (१४.६), नाशिक २९.८ (१३.७), निफाड २८.६ (११.२), सांगली ३१.२ (१६.४), सातारा ३१.२ (१४.८), सोलापूर ३२.२ (१६.२), सांताक्रूझ ३४.४ (१९),

डहाणू २९.३ (१९.१), रत्नागिरी ३४ (२०.४), छत्रपती संभाजीनगर ३१ (१४.४), धाराशिव ३१.२ (१४.८), परभणी २९.६ (१४.४), परभणी कृषी विद्यापीठ २९.६ (१४.४), अकोला ३१.८ (१४.६), अमरावती ३१.२ (१२.४), भंडारा - (१०), बुलडाणा २९.४ (१४.८), ब्रह्मपुरी २९.७ (११.३), चंद्रपूर २९.२ (-), गडचिरोली २९.६ (१२.४), गोंदिया २६.७ (९.८), नागपूर २९.० (८.८), वर्धा २९.५ (११.४), वाशीम ३१ (११.४), यवतमाळ ३०.५ (-).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate: सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय; हमीभावाने खरेदीच्या मर्यादेत वाढ

Developed India: विकसित भारत : वास्तव अन् विपर्यास

APMC Trader Strike 2025: बाजारात शेतकरीच पोरका

Indian Army Selection Story: आदिवासी शेतमजुराचा मुलगा भारतीय सैन्य दलात

Desi Cow Conservation: देशी गोवंश संवर्धनाच्या राज्यपालांकडून सूचना

SCROLL FOR NEXT