Maharashtra Monsoon Update Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Update : राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

IMD Rainfall Alert : आज (ता. २२) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Alert : कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने राज्यात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सुरू असलेला पाऊस पुन्हा ओसरण्याचे संकेत आहेत. आज (ता. २२) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, दोन दिवसांत ते पुन्हा उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. हा आस राजस्थानच्या बिकानेर, कोटा, गुना, सिधी, देहरी, बालूरघाट ते नागालँड पर्यंत विस्तारला आहे. मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, वायव्य मध्य प्रदेशात समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून, सोमवारी (ता. २१) पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. आज (ता. २२) कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT