Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon Rain: पुढील ५ दिवस पाऊस कमी; पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Rain Forecast: राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहे. तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील ५ दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहे. तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील ५ दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्याही विदर्भातील  वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

सोमवारी विदर्भातील  वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच सोलापूर, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

मंगळवारी  वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा पुणे, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. बुधवारी पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: कोकणात उकाडा वाढला; विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढला

Tanta Mukti Committee: गावागावांतील ‘तंटामुक्ती’ कागदावरच

Biometric Attendance: ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक अनिवार्य

Wheat in Summer: उन्हामुळे गव्हाचा दाणा बारीक? तातडीने करायच्या ३ उपाययोजना

Veterinary Doctors Protest: पशुवैद्यक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; १० मार्चला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT