Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची दडी कायम

Maharashtra Latest Rain Update : हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस, पावसासाठी पोषक प्रणालींच्या अभावामुळे राज्याच्या अनेक भागांत पावसाची दडी कायम आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Update : हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस, पावसासाठी पोषक प्रणालींच्या अभावामुळे राज्याच्या अनेक भागांत पावसाची दडी कायम आहे.

आज (ता. १३) कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून, हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ईशान्य उत्तर प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे कायम असून, त्याचे पूर्व टोक बहारिच, सीतामढी, किसानगंज ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे.

सिक्कीमपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत, तसेच दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात मॉन्सून कमजोर असला, तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. अनेक भागांत मुख्यतः पावसाची उघडीप आहे.

ढगाळ हवामानासह उकाडा कायम असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. १३) कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT