Kolhapur Rain News : कोल्हापुरातील धरणे भरली पण पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल

Rain News : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने दिवसभर कडकडीत उन पडले होते.
Kolhapur Rain News
Kolhapur Rain Newsagrowon

Dams in Kolhapur : मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली, तरी अद्याप ११ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने दिवसभर कडकडीत उन पडले होते.

अचानक बंद झालेल्या पावसाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. भात, ऊस, याचबरोबर माळरानावर असलेल्या पिकांना पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी पंप सुरू करण्याची मागणी पंप धारकांकडून करण्यात येत आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी खडक कोगे दुधगंगा नदीवरील दत्तवाड, कासारी नदीवरील यवलूज हे बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फूट ४ इंच इतकी आहे. बुधवारी दिवसभरात शाहूवाडी तालुक्यात ३.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

हातकणंगले तालुक्यात ०.२, शिरोळमध्ये ०.१, पन्हाळा तालुक्यात 1.1 शाहूवाडीमध्ये 3.1 राधानगरीत २.४, गगनबावडामध्ये २.७, करवीर आणि कागलमध्ये ०.३, भुदरगडमध्ये ३, आजरामध्ये १.१, तर चंदगडमध्ये १.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Kolhapur Rain News
Kolhapur Shetkari Sangh : कुंपणच जेव्हा शेत खाते, शेतकरी संघाच्या व्यवस्थापकांनीच ८१ लाखांचा पाडला ढपला

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे तुळशी, वारणा, दूधगंगा आदी धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. शहरात दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक जाणवली. शहरातील रस्त्यांवर धूळ पसरली होती.

जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा

राधानगरी - ८.२१ (८.३६१ टी. एम. सी), तुळशी २.६६ (३.४७१ टी. एम. सी), वारणा २९.४८ (३४.३९९ टी. एम. सी), दुधगंगा २०.८८ (२५.३९३ टी. एम. सी), कासारी २.६४ (२.७७४ टी. एम. सी), कडवी २.५२ (२.५१६), कुंभी २.४२ (२.७१५ टी. एम. सी), पाटगाव ३.३७ (३.७१६ टी. एम. सी), चिकोत्रा १.२८ (१.५२२ टी. एम. सी), चित्री १.८९ (१.८८६ टी. एम. सी), जंगमहट्टी १.२२ (१.२२३), घटप्रभा १.५१ (१.५६०), जांबरे ०.८२ (०.८२० टी. एम. सी ) आंबेओहोळ १.२४ (१.२४० टी. एम. सी ), कोदे ल.पा. ०.२१ (०.२१४ टी. एम. सी )

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com