Monsoon-Sowing Season Agrowon
हवामान

Monsoon 2023: राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप !

Rain Update : राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिली आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याचा परिसर वगळात राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले राहिले आहे.

Team Agrowon

Monsoon Maharashtra : आज राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप होती. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र जोरदार पावसाने आज पाठ फिरवलेली दिसली. दुपारी अनेक भागात उन्हाचा चटकाही जाणवला. आज काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनी वेग घेतला.

वायव्य राजस्थान आणि शेजारच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र समुद्रसापाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. राज्याच्या काही भागात जोरदार पावसाला पोषक हवामान आहे. माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीपेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. कमी दाबाचा पट्टा बिकानेरकडे सरकत आहे. तर कमी दाबावाचे क्षेत्र वायव्य राजस्थान आणि शेजारच्या भागात आहे.

लखनऊ, पटना, बालूरघाट आणि पूर्व मनिपूर भागात कमी दाब क्षेत्राचा पट्टा आहे. पूर्वकडून वाहणारे वारे समुद्रसपाटीपासून ५.१ ते ९.५ किलोमीटर उंचीवर आहेत.  किनारपट्टीला समांतर कमी दाबावाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत विस्तारला आहे. क्षिणेकडे आलेला माॅन्सूनचा आस  आणि किनारपट्टीलगत चक्राकार वारे यामुळे राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा जोर ओसरला. आज काही भागांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. दुपार सर्वच भागात उन्हाचा चटकाही जाणवला. हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर संपूर्ण विदर्भात ठिकठिकामी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT