Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर जोर; काही ठिकाणी विश्रांती

Monsoon Rain : राज्यातील विविध भागांत तब्बल एक महिना दमदार पाऊस झाला. त्यानंतर जोर काही प्रमाणात कमी झाला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील विविध भागांत तब्बल एक महिना दमदार पाऊस झाला. त्यानंतर जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. सोमवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकमधील सुरगाणा, उंबरठाणा येथे २६४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. कृष्णा, भीमा, कोकण, नागपूर विभागांतील धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

कोकणात मागील काही दिवस जोरदार पाऊस पडला. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पालघरमधील तलवड, साइवन १२८ मिलिमीटर पाऊस पडला असून मोखडा ११६, विक्रमगड ११०, जव्हार, साखर १०० मिलिमीटर पाऊस झाला. सततच्या पावसामुळे भात खाचरे तुडुंब भरली आहे. तर भात पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

काही ठिकाणी कमी पाऊस असल्याने भात रोपांची वाढ चांगली आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. ताम्हिणी घाटमाथ्यावर २१२ मिलिमीटर पाऊस झाला. तर लोणावळा, शिरगाव, शिरोटा, वळवण, वानगाव, आंबोणे, दावडी, खोपोली, भिरा या घाटमाथ्यांवर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. तर वैतरणा धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

त्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घाटघर येथे सर्वाधिक २३० मिलिमीटर पाऊस झाला. तर रतनवाडी, पांजरे येथेही मुसळधार पाऊस पडल्याने भंडारदरा, मुळा धरणात वेगाने आवक सुरू झाली आहे. नगर, सोलापूर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. परंतु अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळत आहे.

मराठवाड्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. अनेक भागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असून नांदेडमधील धर्माबाद मंडलात २४, सिरजखोड ३५, कुंटूर ३५ मिलिमीटर पाऊस झाला. तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे कापूस, तूर, बाजरी, सोयाबीन पिकांना चांगलाच आधार मिळत असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

विदर्भातील जांभूळधाबा मंडलात ४५ मिलिमीटर पाऊस झाला. तर चिखलदरा ३४, सेमडोह २९, कोर्ची २८, बेडगाव २४, मासेळी २९, देसाईगंज ३०, शंकरपूर २० मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात अधूनमधून तुरळक सरी कोसळत आहेत. परंतु मागील काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT