Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा अंदाज आहे का? पुढील पाच दिवस राज्यात हवामान कसे राहील

Maharashtra Monsoon Update : रब्बी पेरणीची चिंता कायम आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

Anil Jadhao 

Maharashtra Rain Alert News : राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. तर अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र चक्रीवादळ वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. ही चक्रीवादळ येमेनच्या दिशेने पुढे सरकत आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.

राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा होत असला तरी नोंद घेण्याजोगा पाऊस पडलेला नाही. राज्याच्या अनेक भागात सकाळी हवेत गारवा जाणवत आहे.

तर दुपारी उन्हाचा चटका असह्य होत आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनितील ओलावाही कमी होत आहे. त्यामुळे रब्बी पेरणीची चिंता कायम आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

अरबी समुद्रात अतितीव्र तेज चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ मागील ६ तासांपासून वायव्य दिशेला १३ किलोमीटर प्रतितास वेगाने सरकत आहे. हे चक्रीवादळ सध्या येमेनमधील सोकोत्रापासून २०० किलोमीटर उत्तर वायव्य दिशेला आहे.

तर ओमानमधईल सलालाहपासून दक्षिणेला ३०० किलोमीटर आणि येमेनमधील अल घैदाह पासून आग्नेयला २४० किलोमीटर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ वायव्य दिशेनेच प्रवास करण्याची शक्यता असून पुढील ६ तासांमध्ये तीव्र चक्रीवादळामध्ये रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली येमेनमधील अल घैदाह जवळील बंदरावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी १२५ ते १३५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.

बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागात एक कमी दाब प्रणाली तयार झाली आहे. ही प्रणाली मागील सहा तासांपासून ८ किलोमीटर प्रतितास वेगाने आग्नेय दिशेने सरकत आहे. आज ही प्रणाली ओडिशातील पारादीप पासून दक्षिणेला ४०० किलोमीटर अंतरावर होती.

पश्चिम बंगालमधील दिघापासून दक्षिण नैऋत्यला ५५० किलोमीटर आणि बांगलादेशमधील खेपूपारापासून दक्षिण नैऋत्येला ६९० किलोमीटर अंतरावर आहे. या कमी दाब क्षेत्राचे पुढील १२ तासांमध्ये चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. ही चक्रीवादळ प्रणाली बांगलादेशकडे सरकण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT