Cyclone Tej : तेज चक्रीवादळाची तीव्रता वाढली पण महाराष्ट्रावर संकट टळलं

Cyclone Tej Intensifies Over Southwest Arabian Sea : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'तेज' या चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याचे आज अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.
Tej Cyclone
Tej CycloneAgrowon
Published on
Updated on

Cyclone Tej Alert Update : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'तेज' या चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याचे आज अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ येमेन- ओमानच्या किनाऱ्याकडे सरकत असल्याने त्याचा भारतीय किनारपट्टीला धोका नसल्याचे सांगण्यात आले. मागच्या दोन दिवसांपूर्वी तेज चक्रीवादळाचा परिणाम मुंबईवर होईल असे सांगण्यात आले होते परंतु सध्या धोका टळल्याची माहिती समोर आली आहे.

हे चक्रीवादळ वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील 'तेज' या तीव्र चक्रीवादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते रविवारी येमेनमधील सोकोत्रापासून १६० कि.मी. वर तर ओमानमधील सालालाहपासून ५४० कि.मी.वर होते. ते मंगळवारी दुपारच्या सुमारास (ता. २४) येमेनमधील अल पैदाह आणि ओमानमधील सालालाहदरम्यान तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात धडकण्याचा अंदाज आहे.

तेज चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढील १२ तासांत अत्यंत तीव्र चक्रीवादळामध्ये आणखी तीव्र होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर २४ ऑक्‍टोबरच्या सकाळपर्यंत दिशा बदलून उत्तर-वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. २५ ऑक्टोबरच्या सकाळी हे वादळ येमेन आणि सलालाह, ओमान दरम्यान जमिनीवर येण्याची शक्यता आहे.

Tej Cyclone
Tej Cyclone : अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ; असा होणार महाराष्ट्रावर परिणाम, हवामान खात्याचा इशारा

दरम्यान IMD कडून मच्छिमारांना २५ ऑक्टोबरपर्यंत दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम-मध्य अरबी समुद्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारांना २५ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत या भागात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या समुद्रात असलेल्या लोकांना तत्काळ किनारपट्टीवर परतण्यास सांगितले आहे.

हवामान खात्याने यापूर्वी सांगितले होते की तेज चक्रीवादळ २१ ऑक्टोबर रोजी रात्री चक्रीवादळात तीव्र होईल, नैऋत्य अरबी समुद्रात सोकोत्रा ​​(येमेन) च्या ३३० किमी पूर्वेस, सलालाह (ओमान) च्या ६९० किमी आग्नेय ७२० किमी येमेन पूर्वेकडे लक्ष केंद्रित केले आहे. हे वादळ सध्या २२ ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास अतिशय तीव्र चक्री वादळात रूपांतरित होऊ शकते आणि त्याचा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com