Rain Update Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात उन्हाचा चटका ठरतोय तापदायक

Rain Forecast : महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तसेच विदर्भात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

अमोल कुटे

Pune News : ‘ऑक्टोबर हीट'' वाढल्याने विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. गेले काही दिवस सातत्याने कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ८) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तसेच विदर्भात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्यासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर शनिवारी (ता. ५) महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागांतून माघार घेतली आहे. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल जैसे थे आहे. महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान होत आहे. केरळ आणि परिसरावरील चक्राकार वारे, तसेच बंगालच्या उपसागरापासून लक्षद्वीप बेटांपर्यंत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे अरबी समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे ३६.७ अंश, तर जळगाव, नागपूर, सांताक्रूझ, वर्धा येथे कमाल तापमान पस्तिशीपार आहे. आज (ता. ८) महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूरसह, विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून, तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३२.७, जळगाव ३५.६, कोल्हापूर ३१.९, महाबळेश्वर २५.८, मालेगाव ३१.०, नाशिक ३१.३, निफाड ३१.७, सांगली ३१.८, सातारा ३०.६, सोलापूर ३४.०, सांताक्रूझ ३५.२, डहाणू ३३.३, रत्नागिरी ३३.२, छत्रपती संभाजीनगर ३२.४, बीड ३०.८, परभणी ३४.०, अकोला ३६.८, अमरावती ३४.८, भंडारा ३४.६, बुलडाणा ३४.६, ब्रह्मपुरी ३६.७, चंद्रपूर ३४.६, गडचिरोली ३४.६, गोंदिया ३४.८, नागपूर ३५.४, वर्धा ३५.०, वाशीम ३३.६, यवतमाळ ३४.०.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे

अकोला ३६.८, ब्रह्मपुरी ३६.७, जळगाव ३५.६, नागपूर ३५.४, सांताक्रूझ ३५.२, वर्धा ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT