Drought Agrowon
हवामान

Al Nino Effect : ‘एल निनो’ ओसरतोय

Monsoon Update : प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’चा प्रभाव पुढील दोन महिन्यांत कमी होण्याची शक्यता असून, आगामी मॉन्सून हंगामाच्या आधी महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर (न्यूट्रल) येण्याचे संकेत आहेत.

Team Agrowon

Pune News : प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’चा प्रभाव पुढील दोन महिन्यांत कमी होण्याची शक्यता असून, आगामी मॉन्सून हंगामाच्या आधी महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर (न्यूट्रल) येण्याचे संकेत आहेत.

एप्रिल महिन्यापासूनच एल-निनो सर्वसाधारण पातळीवर येणार असून, मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती तयार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मॉन्सून हंगामातील पावसासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अॅण्ड एटमॉस्फेरिक एडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) ‘एल निनो’चा अंदाज नुकताच जाहीर केला आहे. या अमेरिकी हवामान संस्थेने जगभरातील १६ मॉडेलच्या आधारे दिलेल्या अंदाजानुसार ‘एल निनो’चा प्रभाव पुढील दोन ते तीन महिन्यांत ओसरण्याची शक्यता आहे.

येत्या एप्रिल ते जून दरम्यान प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान त्याच्या सर्वसाधारण पातळीवर म्हणजेच न्यूट्रलवर (सरासरी तापमानाच्या ०.५ अंश सेल्सिअस कमी- अधिक ) येण्याची शक्यता ७३ टक्के आहे. ऑगस्ट- सप्टेंबर या मॉन्सून हंगामाच्या उत्तरार्धात विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता असून, तिथे ‘ला निना’ निर्माण होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असल्याचे या अंदाजात म्हटले आहे.

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सलग तीन महिने सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदले गेल्यास त्या स्थितीला ‘एल निनो’; तर सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदले गेल्यास त्या स्थितीला ‘ला निना’ म्हटले जाते.

प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती सक्रिय असताना भारतात मॉन्सून काळात बहुतेक वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो; तर ‘ला निना’च्या स्थिती दरम्यान बहुतेक वर्षी भारतात मॉन्सून काळात सर्वसाधारण किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो असे आकडेवारी सांगते.

गतवर्षी ‘एल निनो’चा मॉन्सून काळातील पर्जन्यमानावर झाल्याचे दिसून आले. २०२३ मध्ये देशात सरासरीच्या ९४ टक्के, तर राज्यात ९७ टक्के पावसाची नोंद झाली. पावसाचे वितरण असमान असल्याने मध्य महाराष्ट्र सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, हिंगोली आणि विदर्भातील अकोला अमरावती या ९ जिल्ह्यांत पावसाने मोठी तूट दिल्याचे दिसून आले.

तर राज्यातील मुंबई, रत्नागिरी, नगर, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, पुणे, बीड, लातूर, परभणी, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, वाशीम जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली होती. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि नांदेड जिल्ह्यांत मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यंदा राज्यातील अनेक तालुक्यांत पाणी टंचाई जाणवू लागली असून, जलाशयांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे पुढील पाच ते सहा महिन्यांचे नियोजन करावे लागणार आहे.

‘सुपर एल-निनो’चे सवाट दूर?

प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थितीची तीव्रता वाढल्याने आगामी उन्हाळ्यात (मार्च ते मे) एल-निनो आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्र स्थितीत पोचण्याची शक्यता ‘नोआ’ संस्थेने यापूर्वी वर्तविली होती. उत्तर गोलार्धात ‘सुपर एल-निनो’ चा प्रभाव दिसून येण्याचे संकेत होते.

तसेच सुपर एल-निनोमुळे भारतातील मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता मात्र ‘एल-निनो’ ओसरण्याची व ‘सुपर एल-निनो’चे सवाट दूर होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT