Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात अति पावसामुळे वाफसा स्थिती नसणे त्यामुळे रान नीट करण्यासाठी होत असलेला विलंब यामुळे रब्बी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. अद्याप अनेक ठिकाणी रान नीट करण्याची लगबग शेतकरी करत असून पेरणीची गती संथच असल्याची स्थिती आहे. .यंदा अति पावसामुळे पाण्याची झालेली उपलब्धता लक्षात घेता खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची चर्चा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाली होती. तुर्त तरी ही बाब चर्चा करण्यापूर्तीच मर्यादित असल्याची स्थिती आहे. शिवाय लांबलेल्या पेरणीच्या कालावधीमुळे पेरणीचा कालावधी लोटून घेत जाणाऱ्या पिकांच्या कालावधीमुळे पर्यायी पिकांचे बियाणे उपलब्ध करून देता येईल का किंवा आले का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे..Rabi Sowing: कोल्हापुरात रब्बीची पेरणी ८ हजार ८९१ हेक्टरवर.आठही जिल्ह्यांत ७ लाख ११ हजार हेक्टरवर पेरणीमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण २२ लाख ३६ हजार ७८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ ७ लाख ११ हजार ५८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख २७ हजार ५७४ हेक्टर आहे. या क्षेत्रापैकी गत आठवडा अखेरपर्यंत सुमारे १ लाख ६५ हजार ९० हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राचा तुलनेत केवळ २२.६९ टक्केच पेरणी झाली आहे. या तीनही जिल्ह्यांत रब्बी पेरणीची गती जरा जास्तच संथ आहे..दुसरीकडे लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १५ लाख ९ हजार २०७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५ लाख ४५ हजार ९६८.५० हेक्टरवरच म्हणजे सर्व साधारण क्षेत्राच्या तुलनेत ३६.१८ टक्के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली आहे..Rabi Sowing : पुणे जिल्ह्यात रब्बी पेरण्यांची लगबग सुरू.रब्बी पेरणीचे सर्वसाधारण व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणीछ. संभाजीनगर २३८८२१.५५ १६२५४जालना २११८१९ ४७४९१बी २७६९३३.६ १०१३४५.लातूर ३१८६८८ १४६४२९धाराशिव ४१७९०२ १७७१०६नांदेड ३३२४१६ ५९३७५परभणी २७०९७९ ९३४९१हिंगोली १६९२२२ ६९५६७.पावसामुळे आमच्या शिवारात वाफसा स्थितीच नव्हती. आता कुठे वाफसा आल्याने पेरणीने गती पकडली. डिसेंबर पूर्ण पेरनितच जाईल असे दिसते.- रामेश्र्वर मुंडे, दुनगाव, ता. अंबड, जि. जालना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.