Sugar Price : साखर विक्री दरवाढीचा विचार करू; केंद्रीय मंत्री जोशींनी केले स्पष्ट
Minister Pralhad Joshi : इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात इस्माने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साखरेचा विक्री दर प्रति किलो ४० रुपये करण्याची मागणी केली. यावर केंद्रीय मंत्री जोशी यांनी निर्यातीचा साखरेच्या दरावर होणाऱ्या परिणामाचे मंत्रालय मूल्यांकन करेल आणि त्यानंतर किमान विक्री दर वाढवण्याच्या मागणीचा विचार करेल, असे स्पष्ट केले.