Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Rain : पुढील ५ दिवस पाऊस कसा राहणार? उद्यापासून मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

Weather Update : मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर कमी राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. पुढील पाचही दिवस राज्यात पाऊस हजेरी लावू शकतो. आज राज्यतील बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पण मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर कमी राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या ११ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील उरलेल्या ८ जिल्ह्यांमध्ये, खानदेशातील तीन जिल्हे, मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

उद्या कोकण तसेच मध्यम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तर पुणे, रायगड, पालघर, ठाणे तसेच संपूर्ण विदर्भाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. 

शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT