Monsoon Rain : सर्वदूर पावसामुळे धरणसाठ्यांत वाढ

Dam Water Stock : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील ९५ मंडलांत शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे.
Dam Water Stock
Dam Water StockAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील ९५ मंडलांत शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. दहा जुलैपर्यंत राज्यातील धरणांत ३८७९ टीएमसी म्हणजेच २७ टक्के एवढा पाणीसाठा होता.

मात्र धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने १५ जुलैपर्यंत ४४२.५९ टीएमसी म्हणजेच ३१ टक्केपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील कोयना, उजनी, जायकवाडी, वारणा, मुळशी, भाटघर, गिरणा, वरसगाव, भंडारदरा, मुळा, दारणा, राधानगरी, इसापूर, इटियाडोह, गोसीखुर्द, ऊर्ध्व वर्धा या धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक आहे. कोयना घाटमाथ्यांवर सर्वाधिक २३४ मिलिमीटर, तर शिरोटा २१६ मिलिमीटर पाऊस झाला. तर लोणावळा, शिरगाव, भिवपुरी, दावडी, डुंगरवाडी, खोपोली, खांड, ताम्हिणी या घाटमाथ्यांवर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला.

दरम्यान सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तर शिराळा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शिराळा तालुक्यातील करमजाई, अंत्री बुद्रूक ही दोन धरणे १०० टक्के भरली आहेत.

पाणी सांडव्यातून बाहेर पडू लागले आहे. वारणा धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यांत आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांत मागील चोवीस तासांमध्ये ५.७९ टीएमसी एवढ्या पाण्याचा येवा दाखल झाला आहे.

त्यामुळे धरणांतील पाणीसाठा ४१.७० टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. खानदेशात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.

Dam Water Stock
Monsoon Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यातील बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज

कोकणात ५० टक्केपर्यंत धरणे भरली

कोकणात मागील काही दिवसांपासून धुव्वाधार पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. रत्नागिरीतील भरणे मंडलात २९५ मिलिमीटर पाऊस पडला असून अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरहूनअधिक पाऊस झाला आहे.

त्यामुळे कोकणातील धरणांतील पाणीपातळी ही ५० टक्केपर्यंत भरली आहे. तानसा धरणांत ७५ टक्के, तिल्लारी ७८ टक्के, मोडकसागर ६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न चोंडे धरणात ५२ टक्के, भातसा ४९ टक्के, कवडास बंधारा ६५ टक्के भरला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरूच असून सोमवारी (ता. १५) पहाटेपासून देखील जोरदार पाऊस सुरू आहे. किनारपट्टी भागाला वादळीवाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले.

त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले आहेत. दरम्यान जिल्ह्यात काही मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे.

मराठवाड्यात धरणे तळालाच

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. परंतु जोरदार पाऊस नसल्याने अजूनही धरणांतील पाणीपातळी पाहिजे तेवढी वाढलेली नाही. उजनी, माजलगाव, ऊर्ध्व पैनगंगा या धरणक्षेत्रांत बऱ्यापैकी पाऊस आहे.

परंतु या धरणांत आवक सुरू झाली असली तरी जास्त प्रमाणात आवक नसल्याने पाणी पातळीत फारशी वाढलेली नाही. त्यासाठी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

Dam Water Stock
Maharashtra Rain Alert : राज्यात दमदार पावसाची शक्यता

विदर्भातील धरणांत किंचित वाढ

विदर्भात उशिराने मॉन्सून दाखल झाला असला तरी अनेक ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. परंतु मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे विदर्भातील नळगंगा, बेंबळा, पूस, कामठी खैरी, निम्न वर्धा, गोसी खुर्द अशा महत्त्वाच्या धरणांतील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे.

कामठी खैरी धरणांतील पाणीसाठा हा ७७ टक्के, तर खिंडसी धरणांत ६० टक्के, तोतलाडोह ५६ टक्के, निम्न वर्धा धरणांत ५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणांत गेल्या वर्षीपेक्षा काही प्रमाणात अधिक पाणीसाठा झाला आहे.

२०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली मंडले : पालगड २६१.८, शिर्शी २४८.५, आंबवली २३३.५, कुळवंडी २३३.८, दाभीळ २४८.५, नेरळ २००.८.

सोमवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटर (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : पनवेल १०५.५, ओवले, कर्नाळा १०५.५, कर्जत १२४, चौक १२४, महाड १७०, करंजवडी १५३, नाटे १८५, खारवली १७०, तुडली १८५, माणगाव १२८, गोरेगाव, लोणेरे १११, रोहा १०४, नागोठणे ९१.५, कोलाड १११, पोलादपूर १०२, कोंडवी १२२.५, वाकण १०२, श्रीवर्धन १०९, तळा १०४, मेंढा १११, चिपळूण, खेर्डी १९२.८, मार्गताम्हाणे, रामपूर १२२.५, वहाळ १०३, असुर्डे ११२, कळकवणे १९६, शिरगांव १५८, दापोली १०८, वाकवली १९७.८, वेळवी १०८, खेड १९७.८, धामणंद १९२.८, मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे १५७.८, जयगड १०१, फसोप १२५.८, तरवल ११९, कडवी ११९.८, माखजन ११७, फुंणगुस १०८, फणसवणे १०६, देवळे ११२.८, देवरुख ९५.५, तुळसानी १०३, माभळ १०८, तेर्ये १०६, सौंदळ १०३.८, देवगड १२८, मीठबाव १२२.८, मालवण १४९, पेंडूर १४७, मसूरे १४८.८, श्रावण १४४, आबेरी १५०.८, पोइप १२५.५, सावंतवाडी १२४, बांदा १७०, आजगाव १३७, आबोली १५०, मडूरा १५५.८, वेंगुर्ला १४४, शिरोडा १४६, म्हापण १४९.८, वेतोरे १६९, कणकवली १०७, फोंडा ८१.५, कुडाळ १६६, कडावल १३२, कसाल १६१, वालावल १५०.८, माणगाव १३०, पिंगुळी १६२.५, तळवट १५०, भेडशी १६२.८, कांचगड ११०.८.

मध्य महाराष्ट्र : त्र्यंबकेश्वर ६१.८, सारंगखेडा, वडाळी ७५.५, उत्राणगृह ७७.५, पारोळा, शेळावे ७७.५, तामसवाडी ८९.८, बहादरपूर ७७.५, हातले ८६.८, तळेगाव ७५, चापडगाव ८८, चांदा ८७.५, कार्ला ९१, लोणावळा ९१, वेल्हा ८०, परळी ८७, पाटण १११, म्हावशी १२४.५, हेळवाक १५९.८, मरळी १००, मोरगिरी १२५.५, ढेबेवाडी ९१.८, चाफळ ८९.५, तारळे ९८, मल्हारपेठ ९०, तळमावले ९७.८, कुठरे ९१.८, उब्रंज ८४, इंदोली ७०, सुपने ७९.८, कवठे ६८, कोळे १०३, उंडाळे ७३.८, काले ७७.५, महाबळेश्‍वर ९८, लामज १०९, वाळवा ७३, ताकारी १३१, पेठ ८६.८, कासेगाव ७७.५, कामेरी ९१, चरण ११४, आंबा १४०.८, गगनबावडा १०८.५.

मराठवाडा : सिद्धनाथ ६५.५, आसेगाव ५५, कन्नड, चापनेर ८५.८, राजूरी ८२.८, पिंपळनेर ९४.८, कावडगाव ६९.८, धाराशिव ग्रामीण ८७.०, बेंबळी ५७, कासेगाव ५८.८, पारगाव ६९.

विदर्भ : कालयाना ९३, नायगाव दत्तपूर ५४.५, वाशीम ७८.५, कोंढाळा झांबरे ७८.५, मालेगाव ७२, शिरपूर ६६, करंजी ६२.८, धारणी ८५.८, सद्राबुल्दी ६५.८, साटेफळा ८१, नेर ९८, वाढोणा ६३, पोन्हा ६७, सिरसगाव ७१, चंद्रपूर ५८.२, राजुरा ११०, बल्लारपूर ७७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com