Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : पावसाचा जोर कधीपर्यंत राहणार? कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत

Rain Update : हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या बहुतांशी भागात मागील आठवडाभरापासून पाऊस हजेरी लावत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तसेच इतर काही भागात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्यात काही ठिकाणी  जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आजही कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. आज रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.

तर सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. दर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

उद्या रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारीही कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. तर मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमीच राहून काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kidney Sale Case: एकोणीस शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या

Agri Crop Damage: लातूर जिल्ह्यात चौदा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Papaya Price: खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत

Land Acquisition Dispute: दमदाटी करून जमिनी का घेता?

Maharashtra Rain Forecast: यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT