Summer Heat Agrowon
हवामान

Summer Heat : उष्ण रात्रीचा इशारा कायम

Summer Season : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ हवामान होऊन, राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ हवामान होऊन, राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. विदर्भातील वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २) राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण रात्रीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मध्यप्रदेश पासून विदर्भ, कर्नाटक, दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच रात्री देखील उष्ण ठरत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. यातच सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानामुळे वाढलेला उकाडा रात्रीच्या वेळी कायम राहत आहे.

सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वाशीम येथे देशातील उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तापमानात चढ-उतार होत असला तरी राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वरच आहे. आज (ता. २) मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड जिल्ह्यात उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट), देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.४, जळगाव ४०.०, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्वर ३१.५, मालेगाव ३९.४, नाशिक ३७.६, सांगली ३९.४, सातारा ३७.७, सोलापूर ४१.०, सांताक्रूझ ३४.५, डहाणू ३३.४, रत्नागिरी ३३.५,

छत्रपती संभाजीनगर ३८.४, बीड ४०.०, नांदेड ३६.२, परभणी ३६.५, अकोला ४०.२, अमरावती ३९.४, बुलढाणा ३८.६, ब्रह्मपूरी ४०.०, चंद्रपूर ४०.२, गडचिरोली ३७.४, गोंदिया ३८.२, नागपूर ३७.२, वर्धा ३९.०, वाशीम ४१.२, यवतमाळ ३९.५.

- उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

वाशीम ४१.२, सोलापूर ४१, अकोला ४०.२, चंद्रपूर ४०.२, जळगाव ४०, बीड ४०, ब्रह्मपूरी ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT