Summer Heat : उन्हामुळे उष्माघाताचा धोका

Sun Stroke : गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.
Summer Heat
Summer HeatAgrowon

Buldana News : गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे उष्माघातापासून बचाव करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. यासाठी उपाययोजना कराव्यात जेणेकरून यापासून आपल्याला सुरक्षित राहता येईल.

उष्माघाताची प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरनहाइटपर्यंत पोहोचल्यास स्नायूंचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे व धडधडणे ही लक्षणे दिसून येतात.

उष्माघाताची लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार देणे, नियमित चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, कुठूनही रक्तस्राव होणे, तोंडाची त्वचा कोरडी होणे, डोळे शुष्क होणे ही लक्षणे दिसतात.

उष्माघातामुळे त्रास झाल्यास प्रथमोपचारामध्ये त्रास झालेल्या मुला, मुलींना लगेच त्यांचे कपडे सैल, ढिले करावेत, नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात, उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे, जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत.

Summer Heat
Summer Heat Update : उन्हाच्या चटक्याने विदर्भ भाजला

हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा, पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून त्यांना आडवे पडायला सांगावे, मुले जागी असल्यास वारंवार स्वच्छ आणि थंड पाण्याचे घोट पाजावेत. मूल बेशुद्ध असल्यास त्यांना खायला, प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये.

उष्णतेच्या लाटेदरम्यान नागरिकांनी हलके अन्न खावे, फळे आणि सलाडसारखे पचायला हलके असणारे अन्न खावे, पुरेसे पाणी प्यावे, सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत. गॉगल, छत्री, टोपी, बूट, चप्पल, घालूनच घराबाहेर पडावे. प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी. थंड पाण्याने अंघोळ करावी, घराबाहेरील उपक्रम, मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारीता वाढवावी.

Summer Heat
Summer Heat : तापमानाचा पारा ४२ अंशांवर; खानदेशात उष्णता वाढतीच

कमतरता कमी पडू देऊ नये. उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टीचा अवलंब करावा. संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने घेऊन जावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यावर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेव्हा त्या व्यक्तीला वारा घालावा. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली, घाम येणे, घाबरलेली अशी व्यक्ती आढळल्यास टोल क्रमांक १०८ किंवा १०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बचावासाठी करा या उपाययोजना...

उष्माघातापासून बचावासाठी घराबाहेर जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे. सुती, मैल आणि आरामदायी कपडे घालावे. भरपूर ताजे अन्न खाल्ल्यानंतर घरातून बाहेर पडावे. घराबाहेर जाताना डोके झाका किंवा छत्रीचा वापर करावा. पाणी, ताक, ओआरएस पाण्याचे द्रावण किंवा लस्सी, लिंबूपाणी, पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे. उष्माघातापासून बचावासाठी रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नये. उन्हात अधिकवेळ राहू नये, तिखट, मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नये. नेहमी पाणी सोबत ठेवावे.

उष्माघाताची लक्षणे...

उन्हाळा सुरू झाल्यानंतर उन्हात फिरल्यामुळे डोकेदुखी, ताप, जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही लक्षणे दिसून येतात.

उष्माघातावर काय करावे

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवावे, व्यक्तीचे कापडे सैल करावे, त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजावे, तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, बाधित व्यक्तीला तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा.

जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. हे टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी व सुरक्षित राहावे.
- डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com