Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Forecast: राज्यात दोन दिवस पावसाचा जोर राहणार; विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज

Rain Update: राज्यात पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. राज्यात आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तर रविवारी काही भागात पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

विदर्भातील अनेक भागात मागील ४ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे अनेक भागात पिकांचे नुकसानही झाले. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदीया जिल्ह्यात पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मराठवाडा आणि कोकणातही काही ठिकाणी पावसाने पिकांना दणका दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर संपूर्ण कोकण आणि विदर्भातील वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

विदर्भातील इतर जिल्हे, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

उद्या संपूर्ण विदर्भ, संपूर्ण कोकण, धाराशिव आणि लातूर वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. चंद्रपूर, गोंदीया, पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील १६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. 

रविवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर सोमवारी पावसाचा जोर कोकण आणि विदर्भातील काही भागात कमी होण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT