Pune News : पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील धरणांत पाण्याचा मोठा येवा सुरू असून काही धरणे भरली आहेत. तर काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
यामध्ये अलमट्टी, खडकवासला, वडीवळे, गोसी खुर्द, हतनूर, धामणी, बेंबळा, चिल्हेवाडी, बाघ शिरपूर, वारणा या धरणांचा समावेश असून अनेक धरणांत ५० टक्केपर्यंत पाणीसाठा झाला आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस राहिल्यास उर्वरित धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
कोकणात धरणे भरण्याच्या मार्गावर
कोकणातील सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे.प्रामुख्याने मुंबई परिसरातही पावसाचा सरी बरसत आहे. तर देहरी, रत्नागिरी, खेडशी मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कोकणातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहे. तसेच मोडकसागर, तासना, विहार ही धरणे ८० टक्केहून अधिक भरली आहेत.
तर तुळशी हे धरण शंभर टक्के भरले असून भातसा, धामणी, अप्पर वैतरणा या धरणांतही ५० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. दररोज होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांत पाण्याचा मोठ्या प्रमाणात येवा सुरू असल्याने उर्वरित धरणेही लवकर भरतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पावसामुळे भात लागवडी अंतिम टप्यात आल्या असून हा पाऊस भातासाठी योग्य असल्याने रोपांची वाढही चांगली आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम
मागील दहा ते बारा दिवसांपासून सुरुवात केलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. तर पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तर कार्ला, लोणावळा मंडलात २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला असून मुळशी, वडीवळे, टेमघर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
जिल्ह्यातील २६ धरणांत बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नव्याने १०.३४ टीएमसी पाण्याचा येवा आलेला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७१.९२ टीएमसी म्हणजेच ३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील वडीवळे आणि खडकवासला धरणे शंभर टक्के भरली आहेत.
त्यामुळे खडकवासलातून ७ हजार २७६ क्युसेक, वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदीपात्रामध्ये दोन हजार १७२ क्युसेकने, वारणा धरणातून सद्यःस्थितीत सुरू असलेल्या ३८०० क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्रद्वारद्वारे ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्रमधून १६५८ क्यूसेक असे एकूण ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात संततधार आणि वारणा धरण क्षेत्रात पावसाची अतिवृष्टी, तर इतर भागात मध्यम पाऊस पडत आहे.
सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे राधानगरी, वारणा, कोयना या धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातही पुन्हा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दोन मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून धुळे, जळगाव जिल्ह्यांत हलक्या सरी पडल्या.
पूर्व विदर्भात जोरदार पाऊस :
यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. यवतमाळमध्ये गेल्या चोवीस तासांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे खुनी नदीचे पातळी वाढली. त्यामुळे मांडवी ते पाटणबोरी या मार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. गडचिरोलीतील भामरागड-हेमलकसा (पर्लकोटा) वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असल्याने रस्ते बंद करण्यात आले आहे.
मराठवाड्यात हलक्या सरी :
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या.
येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :
कार्ला २९६, लोणावळा २४४.२, देहरी १६३, वेल्हा १२७, पानशेत १३२, आंबेगाव १४९, रत्नागिरी, खेडशी १०२, दहादेवडी १६०, पौड, घोटावडे, माले, मुठे १५१, भोलावडे १००, वेळुंजे १००, बामणोली १०७, महाबळेश्वर १६३, तापोळा १२३, लामज १५३, बोटोनी १०७, करंजी १०७, आलापल्ली १३१, पेरमिली १०३, कासंसूर ११०, अहेरी १०९.
बुधवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)
कोकण : धसइ ७१, नयाहडी ७४, शहापूर, किनहवळी, डोळखांब ७४, खर्डी ८३.५, वसिंद ८६, कर्जत ७१, चौक ७१, वौशी ७६, खोपोली ७०, पेण, कामरली ७६, करंजवडी ८७.८, पोलादपूर, वाकण ८९, चिपळूण ९९.८, मार्गताम्हाणे ७७, रामपूर ७३, वहाळ ७२, सावर्डे ७०, कळकवणे ७६, शिरगांव ९०, आबलोली ७२, हेदवी ७१, जयगड ७१, फसोप १०२, तरवल ८७, मुरडव ७२, फुणगुस ७७, आंगवली ७२, देवळे ७५, देवरुख, तुळसानी ९४, माभळ ७६, बांदा ७५, आबोली ८७, वेतोरे ७१, कांचगड ९१, मनवर ९१, मोखडा ८०, खोडला ९७,
मध्य महाराष्ट्र : उंबरठाणा ८६, धारगाव ९७, पेठ ८४, हरसूल, थानापाडा ८६, नवापूर, नवागाव ८३, विसरवाडी ८०, खांडबारा ७३, अक्कलकुवा ८९, खापर ७६, मोरांबा ७५, मोलगी, वडफळी ८०, आंबवडे ७४, निगुडघर ९१, काले ९७, शिवणे ७१, केळघर ८६, करहर ७३, हेळवाक, मोरगिरी ८३, सैदापूर ९३, चरण ९१, बाजार भोगाव ७९, मलकापूर ८३, आंबा ९२, राधानगरी, कसबा ८०.
विदर्भ : पार्डी ६६, चिखलदरा ७१, शिवणी ६९, बाभुळगाव ९०, वणी ६४, सावर ६९, कळंब ६९, कोठा ६६, जोडमोहा ६६, मेटिखेडा ७९, वाटफळी ६०, वणी ८५, राजूर ७८, भलार ८५, पुनवट ७२, कायार रिसा ६७, शिरपूर ७२, मारेगाव, मार्डी, कुंभा ६८, वानोजा ६२, पांढरकवडा ६५, पाहापळ ६०, चालबराडी ६४, रुंजा ७९, केळापूर ६४, घाटंजी, साखरा ६४, शिवणी ७९, वर्ध ७९, विजय गोपाल, भिडी ६०, रत्नारा ९८, दासगाव ८३, रावणवाडी ८१, कामठा ८१, कुदवा ९८, कवरबांध ७१, चंद्रपूर ८१, घुगस ६८, पडोली ७८, बेंबळ ६६, येनापूर ६६.८, जिमलगट्टा ६५, खामानचेरू ८७, एटापल्ली ८८, मुलचेरा ९२, लागम ७२.
राज्यातील २५ मंडलात पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस
विसर्ग सोडण्यास सुरुवात
पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत वेगाने आवक सुरू
घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस
कोकणात जोर कायमया घाटमाथ्यांवर सर्वाधिक पाऊस पडला
शिरगाव २६६, दावडी २४६, लोणावळा २४५, अंबोणे २४०, वळवण २१८, वानगाव १६७, डुंगरवाडी १८३, भिरा १८३, कोयना १४५, खोपोली १५४, खांड ११०, भिवपुरी १०२,
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.