Monsoon Rain : धरणे भरायला सुरुवात

Rain Update : मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, कोकण आणि विदर्भात होत असलेल्या पावसामुळे धरणांत पाण्याची वेगाने आवक सुरू आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर २६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Maharashtra Dam
Maharashtra DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, कोकण आणि विदर्भात होत असलेल्या पावसामुळे धरणांत पाण्याची वेगाने आवक सुरू आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर २६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

त्यामुळे कोकणातील तुलसी, तानसा, कळमोडी, वडीवळे, अर्जुना ही धरणे शंभर टक्के भरली असून, मोडकसागर, विहार, तिलारी, खडकवासला, कामठी खैरी, राधानगरी, पाटगाव ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहे. उर्वरित धरणांतही पाणीसाठा जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भरलेल्या धरणांतून कोणत्याही क्षणी विसर्ग सोडण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकणात जोर कायम

मागील दहा ते पंधरा दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. रायगडमधील बिरवडी मंडलात सर्वाधिक बिरवडी १६० मिलिमीटर पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी मंडलांत शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस बरसत आहे.

प्रामुख्याने वैतरणा, तासना, विहार, तुलसी या धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहे. त्यामुळे कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, सूर्या, वशिष्ठी या नद्या दुथडी भरून वाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवार (ता. २२) दुपारनंतर कमी झाला.

त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. जिल्ह्यांतर्गत सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असली, तरी वैभववाडी -कोल्हापूर महामार्गावरील किरवे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे ती ठप्प झाली आहे.

Maharashtra Dam
Kolhapur Rain : कोल्हापुरात ‘पंचगंगे’ने इशारा पातळी ओलांडली

घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ताम्हिणीनंतर शिरगाव घाटमाथ्यांवर २१० मिलिमीटर पाऊस झाला. तर लोणावळा, वळवण, अंबोणे, दावडी कोयना, डुंगरवाडी, खोपोली, खांड, भिरा या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडत आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी, टेमघर, पवना या धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. या भागातील ओढे, नाले भरून वाहत असल्याने टेमघर, वरसगाव, पवना, गुंजवणी, मुळशी अशा प्रमुख धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

मागील चोवीस तासांमध्ये एकूण धरणांमध्ये नव्याने ७.४६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा हा ५० टक्क्यांवर गेला आहे. तर खडकवासला धरणांत ८५ टक्के पाणीसाठा झाला असून, २४ ते ४८ तासांमध्ये विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला, तरी धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

त्यामुळे या नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरस्थितीमुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. कोल्हापूर, नाशिक, सातारा जिल्ह्यांतही जोरदार पाऊस पडत आहे. नगर, सोलापूर आणि खानदेशातील जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असून, तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे.

विदर्भात जोर कमी झाला

विदर्भात आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यानंतर आता काहीसा जोर कमी झाला आहे. वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे. गडचिरोलीतील कोर्ची मंडलात १५२ मिलिमीटर पाऊस पडला.

तर तीन मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. उर्वरित वाशीम, अमरावती, गोंदिया, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यांत पावसाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. परंतु मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे गोसे खुर्द धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

तर इतर धरणांतील पाणीपातळी हळूहळू वाढत आहे. मराठवाड्यातही पावसाची काहीशी उघडीप आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी पडत आहे.

Maharashtra Dam
Monsoon Rain 2024 : वरुणाचा कृपावर्षाव

येथे झाला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

पवयंजे ११५, मोराबी ११५, कर्जत १४५, चौक १४५, खोपोली १०४, रोहा १०२, असुर्डे १०१, कणकवली, फोंडा, सांगवे १०२, तळेरे १४५, डहाणू, मालयण १४८, साइवन १०८, कसा १२६, बोयसर १२५, तलासरी १५१, झरी १३१, तलवड १०८, उंबरठाणा १२७, पेठ १००, हरसूल, देवळा ११६, दहीदेवडी १५६, भोलावडे १०७, कार्ला १५५, लोणावळा ११२, वेल्हा १६८, पानशेत १३९, महाबळेश्‍वर १६५, तापोळा ११८, लामज १३४, बेडगाव १२१, मासेळी १५०, केशोरी, महागाव, घोथनगाव १२०.

मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये - (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : देहरी ८२.३, अंगाव ८२.५, अलिबाग ८३.३, किहीम, सरल ९९.८, चरी ८३.३, पनवेल ८२, ओवले ८७, नेरळ ९४, वौशी ९८, पेण ९८, कामरली ९८, माणगाव ९१, इंदापूर ८९, गोरेगाव, लोणेरे ९३, निजामपूर ८९, कोलाड ९३, मुरूड ८६, मेढा ९३, फसोप ८३, तरवल ९६, आंगवली ९२, देवरूख ९४, श्रावण ९८, पोइप ८६, विरार ९४, मानिकपूर, वाडा, कडूस, कोणे, कांचगड ९७.५, मनवर ९७, मोखडा ९९, विक्रमगड ९७.

मध्य महाराष्ट्र : धारगाव ८४, कोहोर, निफाड ८०, वेळुंजे ९७, पौड, घोटावडे, माले, मुठे ९७, निगुडघर ९२, केळघर ९२, हेळवाक, मोरगिरी ८९, आंबा ९८, राधानगरी ९१, कसबा ९१.

विदर्भ : वाढोणा ६१, खारंगणा ९०, वर्धा, अंजी ९०.८, सेलू ६१, झाडसी ९३, काटोल, येनवा ७३, परडसिंगा ६६, सावरगाव ६४, बिशनूर ६४, काकोडी ७६, नवेगावबंध ८५, कुरखेडा ६७, पुराडा ७०, माळेवाडा ६८.

राज्यातील ३९ मंडलांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

मराठवाड्यात पावसाची उघडीप

कोकणात मुसळधार पाऊस

नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com