Rain Udpate Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर जोर, विदर्भातही हजेरी

Latest Rain Update : कोकणात पावसाच्या सरींमागून सरी सुरूच आहेत. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.

Team Agrowon

Pune News : कोकणात पावसाच्या सरींमागून सरी सुरूच आहेत. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची मुख्यतः उघडीप असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.

शनिवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ठाण्यातील भिवंडी आणि रायगडमधील श्रीवर्धन येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शनिवारी (ता. १५) तिसऱ्या दिवशीही कायम आहे.

तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. होडावडा, तुळस या गावांतील भातशेतीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील दोन मध्यम आणि सात लघुप्रकल्पांतून विसर्ग सुरू झाला आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. वेंगुर्ला, मालवण आणि देवगड या तीन तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १४) दुपारनंतर पावसाने सुरवात केली. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी ११ फूट ५ इंच होती. जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, आजरा, पन्हाळा तालुका वगळता इतर ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. ज्या तालुक्यात पाऊस सुरू आहे, तोही पुरेसा नाही.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कमीच राहिला. काही मंडळांमध्ये पावसाची हजेरी दखलपात्र राहिली. आकाशात ढगांची गर्दी मोठ्या प्रमाणात असली तरी त्या तुलनेत पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस( मिलिमीटरमध्ये) (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण : भिवंडी १२०, श्रीवर्धन ११०, पेण, वसई, मुलदे, लांजा प्रत्येकी ९०, सुधागड पाली, कुलाबा, कुडाळ प्रत्येकी ८०, रामेश्वर, माणगाव, म्हसळा, तळा प्रत्येकी ७०, मालवण, उरण, मुरूड, सावंतवाडी प्रत्येकी ६०, राजापूर, देवगड, सांताक्रूझ, वाडा, दापोली, पालघर प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र : पाथर्डी, भुसावळ, चंदगड, महाबळेश्वर, गगनबावडा, पौड प्रत्येकी ३०, इगतपुरी, पेठ, तळोदा, शिरपूर, शाहूवाडी प्रत्येकी २०.

मराठवाडा : किनवट, तुळजापूर प्रत्येकी ४०, माहूर ३०, लोहारा, सिल्लोड, शिरूर कासार, आंबाजोगाई, देगलूर प्रत्येकी २०.

विदर्भ : मंगरूळपीर ८०, दिग्रस ६०, कोर्ची, पांढरीकवडा, मुलचेरा, चिमूर, मानोरा प्रत्येकी ५०, नागभीड, दारव्हा प्रत्येकी ४०, आर्णी, मेहकर, ब्रह्मपुरी, एटापल्ली, मालेगाव, नागपूर कृषी, बार्शीटाकळी प्रत्येकी ३०.

घाटमाथा : डुंगरवाडी ७०, धारावी, ताम्हिणी, भिरा प्रत्येकी ६०, लोणावळा, अंभोणे, दावडी, खोपोली प्रत्येकी ४०.

पाऊस स्थिती अशी...

- सिंधुदुर्गमध्ये संततधार, वेंगुर्ले, मालवणला झोडपले

- रत्नागिरी जिल्ह्यात सरी मागून सरी

- कोल्हापूर जिल्ह्यात रिमझिम

- सांगली जिल्ह्यात ऊन, सावल्यांचा खेळ

- अकोला, नागपूर, सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण

- जळगाव, धुळे जिल्ह्यात रिपरिप

- पुण्यात पावसाच्या रिमझिम सरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT