Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

Imd Alert : हवामान विभागाने कालपासून पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Updateagrowon
Published on
Updated on

Rain In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ८ दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने कालपासून (ता.१४) पावसाने थोडी सुरूवात केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

दरम्यान हवामान विभागाने कालपासून पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड याभागात पावसाने चांगलाच जोर धरला होता.

कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे सकाळी ७ वाजता पंचगंगा नदीची पाणीपातळी ११ फूट ५ इंच इतकी होती. यानंतर पुढच्या ५ तासांनी पुन्हा पाणी पातळी चेक केली असता तब्बल १ फुटाने पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे.

राज्यात पुढील २४ ते ३६ तासांत मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. याबाबत हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, आजरा, पन्हाळा तालुका वगळता इतर ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. ज्या तालुक्यात पाऊस सुरू आहे, तोही पुरेसा नाही, असे चित्र आहे.

Kolhapur Rain Update
Maharashtra Rain Forecast : पावसाचा जोर वाढणार

कालपासून घाटमाथ्यावर होणाऱ्या पावसाचे ढग कोल्हापूर परिसरात येत असल्याने जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, भोगावती नदीकाठी असणाऱ्या गावांमध्येही जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे.

धरणातील पाणीसाठा कमी होऊ नये, यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णत: कमी केला आहे. गगनबावडा तालुक्यातील घटप्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, यातून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाअभावी शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.

दाजीपूर परिसरात अतिवृष्टी

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत दाजीपूर येथे अतिवृष्टी झाली. येथे १४० मिलिमीटर पाऊस नोंद झाला आहे. त्या खालोखाल राधानगरी धरणस्थळावर ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे राधानगरी धरण आज ३.७४ टीएमसी म्हणजे ४४.७३ टक्के भरले असून, जलाशयात पाण्याची वाढ सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com