Rain Update Agrowon
हवामान

Monsoon Rain: राज्यात पाऊस कमी होणार; मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

Rain Forecast: राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भ आणि कोकणात पाऊस हजेरी लावत आहे. पुढील ३ दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भ आणि कोकणात पाऊस हजेरी लावत आहे. पुढील ३ दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला.

उद्या विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला.

गुरुवारपासून विर्भातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात पावसाचा जोर कमी राहणार. शुक्रवारी पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. मात्र, पश्चिम विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

M.S. Swaminathan Award: डॉ. चेरुकुमल्ली श्रीनिवासराव यांना स्वामिनाथन पुरस्कार जाहीर

Water Crisis Planning: कमी पाऊस : चिंता की चिंतन

Land Records Portal Issue: नूतनीकरणाच्या नावाखाली सात-बारा वितरण ठप्प

Indian Constitution: घटनात्मक पायाभरणीमुळे लोकशाही सशक्त: राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Agriculture Committee Extension: मुदतीनंतरही पुन्हा मुदतवाढ

SCROLL FOR NEXT