Rainy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा जोर कायम 

Rain Update: हवामान विभागाने पुढील २ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. दुपारी सध्या उन्हाचा चटकाही जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील २ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला. काही भागात जोरदार ते अतिजोरदार आणि काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.

तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

उद्या आणि बुधवारीही राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दोन्ही दिवसांसाठी देण्यात आला.

खानदेशातील तिन्ही जिल्हे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT