Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Heavy Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ६) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या सुरतगड पासून रोहतक, ओराई, मंडला, कमी दाबाचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे उच्चांकी ३३.४ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर विदर्भ, मराठवाड्यात हलक्या सरी शिंपण करत आहेत.

आज (ता. ६) कोकणातील रायगड, सिंधुदुर्गसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT