Weather Forecast Agrowon
हवामान

Rain Update Maharashtra : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा; विदर्भात जोर वाढणार ?  

Maharashtra Rain Forecast : विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात प्रामुख्याने उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : मागील दोन दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. आता मात्र राज्यात पावसाचा जोर ओसरू लागला आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर पुढील दोन पाच दिवस संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात प्रामुख्याने उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात आज पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर  धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी वादळेवारे आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर पुणे आणि बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात मागील दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं. तर नदीला पुर आल्याने अनेक ठिकाणी संपर्क तुटला.

तर गोठ्यात घरात पाणी शिरून शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ तसेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त  शनिवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस ओसरण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT