Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर दमदार पावसाने तडाखा दिला आहे. जून महिना उलटत आला असतानाही राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. २२) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले असून, ओडीशा आणि छत्तीसगड परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. हे कमी दाब क्षेत्र हळूहळू निवळण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, गुना, मंडला, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम होता.

दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. तर अरबी समुद्र आणि कच्छ परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

विदर्भासह, कोकण, घाटमाथ्यावर पावसाने दणक्यात हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोपोली येथे २३० मिलीमीटर मंडणगड येथे २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात अनेक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

आज (ता. २२) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट आहे. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT