Monsoon Rain : अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत पाऊस मंदावला

Rain Update : मागील तीन-चार दिवस सक्रिय राहिलेल्या पावसाचा गेल्या २४ तासांत जोर बराच कमी झाला आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये अवघा दोन ते चार मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Akola News : मागील तीन-चार दिवस सक्रिय राहिलेल्या पावसाचा गेल्या २४ तासांत जोर बराच कमी झाला आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये अवघा दोन ते चार मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. ढगाळ वातावरण सर्वदूर कायम आहे.

या आठवड्यात अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी दिली. यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यातही रखडलेल्या पेरण्यांसाठी हा पाऊस अधिक फायदेशीर ठरला. काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने नदी-नाले वाहते झाले. काही मंडलांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झालेली आहे.

Monsoon Rain
Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा जोर वाढला

मागील २४ तासांत पावसाचा जोर बराच मंदावला. अकोला जिल्ह्यात अवघा ३.४ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. बुलडाण्यात तर अवघा तीन आणि वाशीम जिल्ह्यांत त्याहीपेक्षा कमी २.३ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या तीन-चार दिवसांतील पावसामुळे शेतीतील कामांसाठी बऱ्याच भागात वाफसा तयार झालेला नाही.

सर्व कामे ठप्प पडलेली आहेत. सलग पावसामुळे आंतरमशागत होऊ शकत नसल्याने गवताला हे पोषक ठरलेले आहे. काही शेतकऱ्यांनी पावसापूर्वी तणनाशकांची फवारणी, खतमात्रा देण्याचे काम केले होते. पावसामुळे शेतीतील कामे ठप्प झालेली आहेत.

Monsoon Rain
Maharashtra Rain Alert : कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

अतिवृष्टीमुळे अकोला तालुक्यात पिकांचे नुकसान

दोन दिवसांपूर्वी अकोला तालुक्यात काही मंडलांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता.१७) सकाळपर्यंत अकोला तालुक्यातील दहिहांडा, उगवा, आगर, पळसो या मंडलांमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली होती.

अकोला तालुक्यात या आठवड्यात पाऊस सक्रिय झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील दहिहांडा १०१.८ मिलिमीटर, उगवा १२३.८, आगर ८४.५, पळसो मंडलात ७७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे नदी-नाल्यांनाही पूर आले. यामुळे तालुक्यातील २३ गावांतील १६२४ हेक्टर क्षेत्रांवरील सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल यंत्रणांनी तयार केला आहे. १२ घरांचेही अंशतः नुकसान झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com