Rain Update In Maharashtra Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : तळ कोकणात पावसाचा जोर वाढला, विदर्भात अतिवृष्टी

Rain News : गेल्या काही दिवसांपासून ओसरलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. तळ कोकणात पावसाचा जोर वाढला आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या काही दिवसांपासून ओसरलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. तळ कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. तर विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसाने अंकुरलेल्या रोपांना दिलासा मिळणार असून, खरिपाच्या उरल्या-सुरल्या पेरण्यांना वेग येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून ओसरलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. तळ कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. तर विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसाने अंकुरलेल्या रोपांना दिलासा मिळणार असून, खरिपाच्या उरल्या-सुरल्या पेरण्यांना वेग येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी (ता. १२) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. गुरुवारी (ता. १३) पहाटेपासूनदेखील पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा सुरुवात होईल, भातरोप पुनर्लागवडीत पडलेला खंड थांबण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, जिल्ह्यासह, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत.

विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत आहे. पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात २४ तासांत सर्वदूर पाऊस पडला आहे. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, जवळा मंडळात, खामगाव तालुक्यांतील पळशी बुद्रूक, पिंप्री गवळी मंडळात, अकोला जिल्ह्यातील राजंदा, अकोला, कापशी, व्याळा, बार्शीटाकळी मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.

मराठवाड्यात ढगांची गर्दी झाली असून, तुरळक, हलकी, मध्यम स्वरूपात पाऊस हजेरी लावत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत हेच चित्र पहावयास मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, सोयगावसह सिल्लोड तालुक्यांतील काही मंडळांत पावसाचा जोर अधिक होता.

जालना जिल्ह्यातील भोकरदन व जाफराबाद तालुक्यात जोरदार सरी कोसळल्या. बीड जिल्ह्यात आंबेजोगाई व केजमधील काही मंडळात चांगला पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात रेनापुरसह अहमदपूर तालुक्यातील काही मंडळात पावसाच्या कमी अधिक सरी पडल्या. गुरुवारी (ता. १३) दुपारनंतर जालना जिल्ह्यातील राजूरला जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.

गुरुवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

कोकण :

वाडा ९०, देवगड, सावंतवाडी प्रत्येकी ६०, पालघर, जव्हार, तळा प्रत्येकी ४०, संगमेश्वर, विक्रमगड, मंडणगड, मालवण, शहापूर प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :

यावल ८०, तळोदा ७०, देवरूख, अक्कलकुवा प्रत्येकी ५०, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव प्रत्येकी ३०, इगतपुरी, शहादा, मुक्ताईनगर, गगनबावडा प्रत्येकी २०.

मराठवाडा :

किनवट ५०, माहूर, देगलूर, धर्माबाद प्रत्येकी

३०, हिंगोली, कळमनुरी, रेणापूर, हदगाव, सोयगाव, निलंगा, जाफराबाद, कन्नड, भोकरदन, मुखेड प्रत्येकी २०.

विदर्भ :

अकोला १३०, खामगाव ९०, बार्शीटाकळी ८०, वरूड ७०, अकोला, बाळापूर प्रत्येकी ६०, पातूर, अर्णी, अंजनगाव, नंदुरा, महागाव, जळगाव जामोद प्रत्येकी ५०, धारणी, मलकापूर, मातोळा, मंगरूळपीर, उमरखेड, चिखलदरा, करंजालाड, पुसद प्रत्येकी ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT