Nanded Rain : नांदेडला पावसाचा जोर ओसरला

Nanded Rain Update : जिल्ह्यात तब्बल एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आगमन झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. या पावसामुळे खरिपातील पेरण्यांना प्रारंभ झाला.
Sowing
Sowing Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात तब्बल एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आगमन झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. या पावसामुळे खरिपातील पेरण्यांना प्रारंभ झाला. परंतु मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे.

मागील आठ दिवसात आजपर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरीनुसार केवळ ५५ टक्के पाऊस झाला आहे. पेरणी केलेल्या कोवळ्या मोडांना आता मात्र दमदार पावसाची गरज आहे.

Sowing
Heavy Rain : कापडणे, वडणे, निकुंभे परिसरात मुसळधार

जिल्ह्यात दरवर्षी जूनमध्ये पावसाचे आगमन होते. यानंतर लगेच पेरण्यांच्या कामांना सुरवात होत असते. परंतु यंदा जून महिना पूर्ण दिवस कोरडा गेल्याने खरिपातील पेरण्यांचे कामे खोळंबली होती. यानंतर दोन जुलैपासून पावसाने काही प्रमाणात सुरवात केली. यानंतर मात्र पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामांना सुरवात केली.

मागील आठ दिवसात जिल्ह्यातील अनेक भागात पेरण्यांची कामे जवळपास आटोपत आली आहेत. परंतु मागील दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जेमतेम पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

Sowing
Himachal Rain : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पुरामुळे १७ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आजपर्यंत २२६.३० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षीत होते. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. पेरणी केलेल्या पिकांना मात्र आता पावसाची गरज आहे.

आजपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर)

नांदेड - ८३.५०, बिलोली - १२५.१०, मुखेड - १७८.९०, कंधार - ७२.३०, लोहा - ९०.३०, हदगाव - १२३.४०, भोकर - १२०.२०, देगलूर - १०४.८०, किनवट - १६९.५०, मुदखेड - १४३.४०, हिमायतनगर - ७१.५०, माहूर - १९४.३०, धर्माबाद - १०२.९०, उमरी - १४६.३०, अर्धापूर - १२२.५० व नायगाव - १०७.९६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com