Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात जोरदार पाऊस

Monsoon Rain 2024 : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत तुरळक जोरदार पाऊस पडला.

Team Agrowon

Pune News : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत तुरळक जोरदार पाऊस पडला. गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत भंडाऱ्यांतील कोंढा मंडलात १४९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे अजूनही काही धरणांत पाण्याचा येवा सुरू आहे.

विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यवतमाळमधील माणिकवाडा मंडलात ११९ मिलिमीटर, तर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पाहूर मंडलात ५८.० मिलिमीटर, कोळंबी ५०.३ मिलिमीटर, अमरावतीतील अजानसिंगी मंडलात ९०.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस झाला.

वर्ध्यातील सेलू मंडलात ७७.५, विरूळ ७७.८, नागपूरमधील नंद मंडलात ६८, कुही ५९, भंडाऱ्यातील पवनी ८८.५, भागडी ८३.५, गोंदियातील अर्जुनी मोरगाव ८४, चंद्रपुरातील शंकरपूर ५४.५ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे कापूस, मूग, उडीद पिके तरारली आहेत.

कोकणात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. बुधवारी पुन्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्गमधील आंबेरी, वालावल मंडलात सर्वाधिक १०७.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर मालवण मंडलात ९९.३ मिलिमीटर, देवगड ९७.८, पडेल ८३.०, मडूरा ८२ मिलिमीटर पाऊस पडला. सिंधुदुर्गमधील या पावसामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी, वशिष्ठी या नद्या चांगल्याच प्रवाही झाल्या असून काही प्रमाणात दुथडी भरून वाहत आहेत.

खानदेशात काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी अधूनमधून ऊन पडत आहे. तुरळक ठिकाणी शिडकावा होत आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यांतील शेवगाव मंडलात ४९ मिलिमीटर, तर बोधेगाव ६८, चापडगाव ५४.५, साताऱ्यातील लामज ३०.०, कोल्हापुरातील गगनबावडा ३७.५, कडगाव ७० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT