Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांत पावसाचा जोर कमीच

Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कमीच राहिला.
Published on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा जोर कमीच राहिला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील बहुतांश मंडलात हलका, मध्यम पाऊस झाला. तर बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी अत्यल्प होती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव मंडलात ७०.८ मिलिमीटर, तर लोणी मंडलात ६७ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील ८३ पैकी ८१ मंडलांत पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. वैजापूर, सोयगाव, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अनुक्रमे पावसाचा जोर थोडा अधिक राहिला.

Monsoon Update
Rain Update : इंदापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

इतर तालुक्यांत पावसाची हजेरी तुरळक हलक्या स्वरूपाची होती. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४२ मंडलांत पाऊस झाला. जिल्ह्यातील बदनापूर परतूर मंठा तालुक्यात अनुक्रमे पावसाचा जोर अधिक होता. इतर तालुक्यांतील मंडलांमध्ये तुरळक हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी केवळ २५ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. दोन-तीन मंडलांचा अपवाद वगळता पावसाची हजेरी नगण्य अशीच होती.

Monsoon Update
Maharashtra Rain : सिंधुदुर्गात किनारपट्टीवर मुसळधार पाऊस

जिल्ह्यातील मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा :

उस्मानपुरा १३.५, कांचनवाडी ३०, लाडसावंगी १६.८, करमाड ९, हरसूल २२.८, कचनेर १०.५, पंढरपूर ३०, पिसादेवी ६.५, वरुड काजी ११, अडुळ ३९, बिडकीन ६.८, निलजगाव ६.८, विहामांडवा ५.३, आपेगाव ५.३, गंगापूर ६.५, तुर्काबाद ४९.३, वाळूज ५१.३, सिद्धनाथ वडगाव ७, गाजगाव ७, वैजापूर २०, खंडाळा १८.३, शिऊर २०.५, बोरसर २६.३, महालगाव ११.३, नागमठाण २५.३, जानेफळ १५.५, यगाव ६.३,कन्नड ९.५, चापानेर ९.५, देवगाव ६, चिकलठाण ६.८, भराडी ९.३, अजिंठा ९, अंभई १९.३, शिवना १३.८, उंडणगाव ६.५, सोयगाव १४, जरंडी २६.५.

जालना जिल्हा

भोकरदन १६, सीपोरा ४.८, धावडा ६.८, जाफराबाद ५.३, माहोरा ४.८, कुंभारझरी १४.३, टेंभुर्णी ९.३, वरुड १४.५, जालना शहर ५.८, जालना ग्रामीण ९.८, नेर १२, शेवली २५.३, विरेगाव १६.५, रामनगर २४.८, पाचनवडगाव १७.३, अंबड २५, गोंदी १०.३, परतूर २७.८, वाटूर १५, आष्टी ७, श्रीष्टी २७.८, सातोना १९, बदनापूर ४४.८, बावणे पांगरी ७.५, रोशनगाव २९.३, राणी उचेगाव २२, रांजणी १३.५, तळणी २०, ढोकसाळ ७, पांगरी १२.

बीड जिल्हा

पाटोदा ५, दासखेड ९.८, थेरला १०.५, अमळनेर ६.५, आष्टी ८.८, कडा २३.५, टाकळसिंग ३, धामणगाव ३.५, पिंपळा ४, रेवती १९.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com