Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात आजही पावसाची दडी; पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज काय राहील?

Maharashtra Monsoon Forecast : मागील तीन दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी पिकांच्या आंतरमशागतीचं कामं करत आहेत.

Team Agrowon

Rain Andaj: आज राज्यातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळ सुरूच राहील. तसेच पुढील पाच दिवस राज्यात मुख्यत; ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरीचा शिडकाव होण्याचा अंदाज दिला आहे.  

मागील तीन दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी पिकांच्या आंतरमशागतीचं कामं करत आहेत.

ऑगस्टचा दूसरा आठवडा सुरू संपत असताना राज्यात सर्वदूर अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यात आज पावसाची मुख्यत उघडीप होती. राज्यातील तुरळक ठिकाणी सकाळी पावसानं हलक्या पावसानं हजेरी लावली. बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

आज दुपारनंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला आहे. तसेच उन सावलांच्या खेळात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. हवामान विभागानं पुढील पाच दिवसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील पाचही दिवस राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे गेल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी एखादं-दुसरी सर हजेरी लावत आहे. ईशान्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे कायम आहे. हा आस पंजाबच्या अमृतसर, चंडीगड, नाजीबाबाद, गोरखपूर, मुझफ्फराबाद, मालदा ते मिझोराम पर्यंत विस्तारला आहे. मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT