Monsoon 2023 : या आठवड्यात पाऊस पडेल का? आज कुठे पाऊस पडला?

IMD weather update : आजही राज्यात पाऊस नव्हता. पुढील दोन दिवसही राज्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाज आहे.
Pre-monsoon rains intensify in Nagar district
Pre-monsoon rains intensify in Nagar district

Rain update : राज्यात कालपासून पावसाने उघडीप दिल्याचे दिसते. काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. पण जोरदार पावसाची नोंद नाही. आजही राज्यात पाऊस नव्हता. पुढील दोन दिवसही राज्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पूर्व विदर्भातील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो? असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

Pre-monsoon rains intensify in Nagar district
Interculture Operation : पाऊस थांबेना, आंतरमशागत होइना

दक्षिण बिहार आणि शेजारच्या परिसरात चक्रीकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली होती. ही स्थिती आता उत्तर बांगलादेशच्या भागात समुद्रसपाटीपासून ९०० मीचर उंचीवर आहे.  तर माॅन्सूनचा आस असलेला कमी दबाचा पट्टा पंजाबमधील अमृतसर, कर्नाल, बरैली, गोरखपूर, भागलपूर आणि मालदा परिसरात विस्तारला आहे. हा पट्टा पूर्वेकडे मनिपूरच्या भागाकडे सरकत आहे. तसेच उत्तर गुजरात आणि शेजारच्या परिसरात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

Pre-monsoon rains intensify in Nagar district
Kolhapur Collector : कोल्हापुरातील पूर नुकसानीचे पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना

आता तुम्ही म्हणाल, या सर्व तांत्रिक माहितीचं आम्ही काय करू? पण या वातावरणातील स्थिती माॅन्सूनवर परिणाम करत असतात. चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र यामुळे पाऊस पडण्याची शक्यता तयार होत असते. त्यामुळे हवामान विभाग रोज अंदाज देताना कमी दाब क्षेत्र, चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि माॅन्सूनची स्थिती याची माहिती देत असते.

महाराष्ट्राचा विचार करता आज पाऊस उघडीप देण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवसही राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. गुरुवारपासून पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पण आज आणि पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com