Monsoon Rain  Agrowon
हवामान

Rain Forecast : दक्षिण कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार

Monsoon Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. ४) दक्षिण कोकण, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. ४) दक्षिण कोकण, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात विजासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे, तर पूर्वभाग सर्वसाधारण स्थितीत आहे. हा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून कर्नाल, शहाजहानपूर, सुल्तानपूर, डाल्टोनगंज, दिघा ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, तसेच नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.

पाऊस वाढण्यासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने आज (ता. ४) कोकणासह घाटमाथ्यावर जोर वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

तर विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

ठाणे, पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT