Monsoon 2023 Update : जूनमध्ये सरासरीच्या केवळ तीस टक्केच पाऊस

Maharashtra Rain Update : नांदेड जिल्ह्यात दरवर्षी जूनमध्ये मॉन्सूनचे धडाक्यात आगमन होत असते. अनेक वेळा या महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात दरवर्षी जूनमध्ये मॉन्सूनचे धडाक्यात आगमन होत असते. अनेक वेळा या महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. परंतु यंदा मात्र जूनमध्ये पावसाने डोळे वटारल्याचे दिसून येत आहे. जूनमध्ये सरासरी १५५.४० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असते, यंदा फक्त ४५.४० मिलिमीटरनुसार केवळ २९.६० टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे खरिपातील पेरण्यासह पाणी, चाराटंचाईची शक्यता बळावली आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक नांदेडमध्ये सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस पडतो. हमखास पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यात नांदेडचा समावेश आहे. मागील दोन वर्षे, तर वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस नांदेडमध्ये झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणसाठाही ओसंडून वाहत असतो. परंतु यंदा मात्र पावसाने जूनमध्येच दडी मारली आहे. यामुळे खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

सोबतच पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. जूनमध्ये वार्षिक सरासरीच्या १५५.४० मिलिमीटर पाऊस अपेक्षीत असतो. परंतु यंदा एका महिन्यात केवळ ४५.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच जून महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या केवळ तीस टक्केच पाऊस या महिन्यात झाल्याने तब्बल ७० टक्के पावसाची तूट जूनमध्ये निर्माण झाली आहे.

Rain Update
Rain Update : जून महिन्यात राज्यात अवघा ५४ टक्के पाऊस

हा पाऊस देगलूर, कंधार, लोहा, नांदेड, हिमायतनगर, भोकर, मुखेड, हदगाव या तालुक्यांत ५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी जून उलटूनही खरिपातील पेरण्यांची कामे ठप्प पडली आहेत. पेरणीला उशीर झाला, तर उत्पादनात घट येईल, कमी कालावधीत येणारी उडीद, मूग यांसारखी पिके घेता येणार नाहीत,

Rain Update
Akola Rain News : जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता कायम

या शंकेने शेतकरी धास्तावले आहेत. यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होतो. यातून जनावरांच्या गुजराण होते. परंतु यंदा मात्र चाऱ्यासह पाण्याचा प्रश्‍न उद्‍भविण्याची शक्यता बळावली आहे.

दृष्टिक्षेपात जूनमधील पर्जन्यमान

जूनमधील सरासरी पाऊस १५५.४० मिलिमीटर

आजपर्यंत झालेला पाऊस ४५.४० मिलिमीटर

जूनमधील पावसाची टक्केवारी २९.६० टक्के

जूनमधील घटलेला पाऊस ७०.४० टक्के

वार्षीक सरासरीच्या तुलनेत पाऊस ५.०६ टक्के

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com