Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर दमदार पावसाचा अंदाज

अमोल कुटे

Pune News : कमी दाबाचे क्षेत्र, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे गेली काही दिवस घाटमाथ्या आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावरील कमी दाब क्षेत्र निवळले असून, झारखंड आणि परिसरावर ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीवर गेला असून, राजस्थानच्या बिकानेर, सिकार, ग्वालेर, खजूराहो, रांची, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम होता. मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणासह, घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला होता. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा येवा वाढला. पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक दिसून आला.

ताम्हिणी येथे राज्यातील उच्चांकी २७० मिलीमीटर, दावडी आणि कोयना नवजा येथे प्रत्येकी २४० तर शिरगाव येथे २१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

आज (ता. २४) कोकणातील रायगड, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट आहे. मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसांच्या हलक्या सरींसह मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रायगड, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT