Kolhapur Rain Flood : राधानगरी ८५ तर काळम्मावाडी ६४ टक्क्यांवर, पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ

Orange Alert Kolhapur : हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामुळे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Kolhapur Rain Flood
Kolhapur Rain Floodagrowon
Published on
Updated on

Kolhapur River Flood : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ३ दिवसांपासून पावसाने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाराची पाणी पातळी ४१ फुटांपर्यंत गेली आहे तर एकूण ७८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामुळे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे.

राधानगरी धरण ८४.२ टक्के भरले असून, काळम्मावाडी (दूधगंगा) ६३.५ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील सर्व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास १५ ऑगस्टपर्यंत धरणे पूर्ण क्षमतेने भरतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे यंदा मे महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठा नेहमीपेक्षा लक्षणीय कमी झाला. त्यामुळे पाणीबाणीचे संकट उभे राहिले होते. यंदा मान्सून पूर्ण क्षमतेने बरसत असल्याने धरणातील पाणी साठ्याबद्दल निश्चिती व्यक्त केली जात आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, १५ जुलैनंतर दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस पडत असल्याने धरणाच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्याचा मुख्य जलस्त्रोत असलेले राधानगरी आणि काळम्मावाडी धरण ६० टक्के पेक्षा जास्त भरले आहे. पुढील काही दिवसात राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडतील. जिल्ह्यातील अन्यधरणातही पाणीसाठा वाढला आहे. जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहळ, सर्फनाला हे लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

Kolhapur Rain Flood
Kolhapur Flood : पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

५६ लोकांचे स्थलांतर, ८ राज्य मार्गावर पाणी

अतिवृष्टी सदृश पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये १३ घरांची पडझड झाली. तसेच ५० लोकांचे स्थलांतर करण्यात आले. ७८ बंधारे पाण्याखाली गेले असल्याने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ८ राज्य मार्गावर पाणी आहे. जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे.

नद्यांची पाणी पातळी वाढेल तसा महापुराचा धोकाही वाढत आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील १३ पक्क्या घरांची पडझड झाली. तर ३७ कच्या घरांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५० लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यातील २० जण महापालिका क्षेत्रातील आहेत. पावसात ५२ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. ८ राज्य मार्ग आणि प्रमूख १६ मार्गावर पाणी आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com