Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

Rain Forecast : काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर सोमवारपासून पुन्हा पावसाची उघडीप राहील. मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली. कोकणात पावसाचा जोर अधिक होता. कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई तसेच पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तर नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातही पुणे, नगर आणि धुळे तसेच जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला होता. 

उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तसेच विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तर विदर्भातील इतर जिल्हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्हे आणि मराठवाडा तसेच खानदेशात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सोमवारी आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT