Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2023 Forecast : राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; विदर्भातील काही भागांमध्ये जोर वाढणार

Maharashtra Weather Prediction : आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर अतिजोरदार पाऊस झाला. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांमध्ये जोरदार सरी पडल्या.

Team Agrowon

Maharashtra Monsoon News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र कायम आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागात सर्वदूर पाऊस पडत आहे. आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर अतिजोरदार पाऊस झाला. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांमध्ये जोरदार सरी पडल्या. हवामान विभागाने आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, मंडला, दुर्ग भागात आहे. तसेच हा पट्टा पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र कायम असल्याने राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग  जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगबुडी, शास्त्री, वाशिष्ठी नद्या इशारा पातळीवरून वाहत असून किनारी भागात पूर आला आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार पाऊस झाला. तर सोलापूर जिल्ह्यातही सलग दुसऱ्यादिवशी पावसाने हलकी हजेरी लावली.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर व धाराशिव या पाचही एक-दोन मंडलांचा अपवाद वगळता २९५ मंडलांत पावसाची हजेरी लागली. त्यापैकी ९४ मंडलांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. विदर्भातील अनेक भागांमध्येही पावसाचा जोर काहीसा जास्त होता. तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तसेच काही भागांमध्ये पावसाची उघडीप होती.

हवामान विभागाने आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात अति जोरदार पावसाचा 'रेड अलर्ट' हवामान विभागाने दिला. तसेच विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर तर कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबईत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. हवामान विभागाने सोलापूर, सांगली, नगर, नाशिक आणि जळगाव सह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT