Rain Agrowon
हवामान

Monsoon 2023: पावसाने ११ जिल्ह्यांना झोडपले; काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Forecast : मराठवाडा आणि खानदेशात बहुतांशी ठिकाणी आज पावसाची उघडीप पाहायला मिळाली. हवामान विभागाने आजही राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.

Team Agrowon

Maharashtra Latest Rain Update : राज्याच्या काही भागात आज पावसाचा जोर कमी झाला होता. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. मराठवाडा आणि खानदेशात बहुतांशी ठिकाणी आज पावसाची उघडीप पाहायला मिळाली. हवामान विभागाने आजही राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.

राज्यातील अनेक भागात आज जोरदार पाऊस झाला. तर बहुतांशी भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. काही भागांमध्ये मात्र केवळ ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आजही मुसळधार पाऊस झाला. कोकणतील रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार काही तास सुरु होती. पुणे आणि सातारा जिल्ह्यातही बहुतांशी ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळाला.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यातही अनेक भागात जोरदार पाऊस पडला. मराठवड्यातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. खानदेशातही अनेक भागात हीच स्थिती राहीली. पण मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कमीच होता. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत होत्या.

हवामान विभागाने आज राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. कोकणातील रत्नागिरी, रायगड, पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा बहुतांशी ठिकाणी अंदाज दिला. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यातही बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.

तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यासह विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. यासोबतच मराठवाडा आणि खानदेशातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील, असा अंदाज जारी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Five State Elections: वेध पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे

ST Bus Service: एसटी नेमकी कोणाच्या सोईसाठी?

Pune Sugar Factories: पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने चमकले

Malegaon Sugar Factory: माळेगावच्या सभासदांना अंतिम ऊसदर ३,६५० रुपये

Wildlife Crop Damage: हनुमानवस्तीत माकडांचा धुडगूस

SCROLL FOR NEXT