Monkey attacks on farms: वाल्हे (ता. पुरंदर) हद्दीतील हनुमानवस्ती परिसरात माकडांच्या कळपांनी हैदोस घातला असून, पिकांचे नुकसान करण्याबरोबरच घरांवरील कौले आणि जनावरांच्या गोठ्यांवरील पत्र्यांचेही नुकसान करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्याबरोबरच घर आणि गोठ्यांचेही संरक्षण करावे लागत आहे. माकडांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. .यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी बाजरी, भुईमुग, मका आदी पिके घेतली आहेत. काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. .Agriculture Success Story: एकत्रित जपलेली कुटुंबपद्धती, यशस्वी एकात्मिक शेती .मात्र पिके काढणीच्या टप्प्यावर येत असतानाच रानडुक्कर, हरणे आणि माकडांचे कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. .Rural Farmers Success Story: काळानुसार व्यावसायिक वृत्ती ठेवून वाटचाल करणारे वर्दे.दरम्यान आज शुक्रवारी (ता. ११) हनुमानवस्ती येथील शेतकरी दादा तुकाराम पवार यांच्या सहा गुंठे भुईमुगाच्या शेतात शुक्रवारी सकाळी सुमारे २० ते ३५ माकडांच्या कळपाने धुडगूस घातला. कळपाने भुईमुगाचे मोठे नुकसान केले. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसरात्र शेताची राखण करावी लागत आहे..माकडांना तसेच हरणांना रोखण्यासाठी शेतकरी बुजगावणे उभारणे, वाघऱ्या लावणे, फटाके फोडणे व मोठमोठ्याने आवाज करणे असे विविध उपाय करत आहेत. ‘‘माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे महिला व लहान मुलांमध्येही भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना करावी,’’ अशी मागणी कैलास पवार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.